मुंबई । प्रतिनिधी - दिवा स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली असून रोज गर्दीतून धक्काबुक्की करत प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. हीच बाब ओळखून दिवा रेल्वे प्रवासी संघटनेने दिवा स्थानकाजवळ भव्य असे आरोग्य शिबीर राबविले. प्रवासी संघटने तर्फे राबविण्यात आलेल्या शिबिरात अनेक प्रकारच्या तपासण्या मान्यवर डॉक्टरांच्या हस्ते करण्यात आल्या व मापक दारात आयुर्वेदिक औषधे देखील उपलब्ध करून देण्यात आली. तसेच या शिबिरात मोफत डोळे तपासणी सुद्धा करण्यात आली. दिवा विभागात प्रथमच अशा प्रकारचा आयुर्वेदिक शिबीर आयोजित केल्यामुळे नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.
दिवा रेल्वे प्रवासी संघटनेच्या माध्यमातून दिव्यातील रेल्वे प्रवाशांचे अनेक प्रश्न मार्गी लागले असून अन्य मागण्यांसाठी सतत पाठपुरावा सुरूच असतो आणि त्याच बरोबर स्वच्छता अभियान, जनजागृती कार्यक्रम व आरोग्य शिबिरासारखे कार्यक्रम संघटना राबवत असल्याने संघटनेच्या कार्यक्रमाला दिव्यातील प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद लाभतो असे दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड. आदेश भगत यांनी सांगितले. यावेळी स्थानिक नगरसेविका दिपाली भगत, नगरसेवक अमर पाटील, भाजप सरचिटणीस रोहिदास मुंडे, विभाग प्रमुख उमेश भगत, भाजप वार्ड अध्यक्ष रोशन भगत, सचिव सचिन भोईर, पोलीस पाटील प्रशांत पाटील, काँग्रेस दिवा ब्लॉक अध्यक्ष मयूर भगत, अनिल नाईक, आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नितीन चव्हाण, विनायक सावंत, सुनील भोसले, आरती मुळीक, दिव्या मांडे, सूचिता गुरव, संदीप कदम, विनायक सावंत, वसंत घाडीगांवकर, युवराज पवार,अँड.दिनकर देसाई, अशोक सावंत, राकेश मोर्या, दत्तात्रय सावंत, आशिष कांबळे, सिद्धेश धुरी, बळीराम भोसले, गणेश मोहिते, प्रदीप पळसंबकर, विद्यासागर दुबे आदींनी परिश्रम घेतले.