फॅशनस्ट्रीटवरील 30 अनधिकृत स्टॉल पालिकेने हटवले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

फॅशनस्ट्रीटवरील 30 अनधिकृत स्टॉल पालिकेने हटवले

Share This
मुंबई - मुंबईत सुप्रसिद्ध असलेल्या फॅशनस्ट्रीटवरील 30 अनधिकृत दुकानदारांवर पालिकेने काही महिन्यांपूर्वी कारवाई केली होती. या दुकानांच्या जागेचा वापर बेकायदेशीरपणे केला जात होता. हा प्रकार निदर्शनास आल्यावर पालिकेने हे स्टॉल हटवले असल्याची माहिती सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.
     
नेमून दिलेल्या जागेव्यतिरिक्त फुटपाथवरही व्यवसाय थाटून अतिक्रमण केल्याने काही दिवसांपूर्वी पालिकेने ३९६ स्टॅालधारकांना नोटिसा पाठवल्या आहेत. नेमून दिलेल्या जागेवरच व्यवसाय सुरु ठेवा असे पालिकेने सूचना केल्या आहेत. दरम्यान, यापूर्वी परवाने रद्द झालेल्या 30 स्टॅालधारकांच्या जागेवर अनधिकृत स्टॉलधारकांनी व्यवसाय थाटल्याचे निदर्शनास आल्यानंतर पालिकेने हे स्टॉल हटवले. येथे पुन्हा अनधिकृतपणे व्य़वसाय सुरु केले जातील अशी शक्यता असल्याने पालिकेने य़ा जागांवर कंपाऊंड घातले आहे.
मागील वर्षी ५० स्टॉलना नोटीसा पाठवल्या होत्या. त्यापैकी ३० जणांचे लायसन्स रद्द करण्यात आले होते. त्यामुळे या रिकाम्या जागा अनधिकृत स्टॉलधारकांनी अडवल्या होत्या. त्यांच्यावर कारवाई झाल्याने या जागा आता मोकळ्या झाल्या आहेत, असेही दिघावकर यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages