झोपडपट्टीत कचऱ्यापासून खत निर्मिती - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 May 2018

झोपडपट्टीत कचऱ्यापासून खत निर्मिती


मुंबई - मुंबई मधील झोपडपट्टी परिसरात जमा होणाऱ्या कचऱ्यापासून महापालिका खत निर्मिती करत आहे. एम पूर्व प्रभागात खासगी संस्थेच्या सहकार्याने २२ टन खत निर्मिती केली जात आहे. प्रकल्पाची क्षमता १०० टन खत निर्मिती करण्याचा प्रशासनाचा मानस आहे, अशी माहिती 'एम पूर्व' विभागाचे सहाय्यक आयुक्त श्रीनिवास किलजे यांनी दिली.
'एम पूर्व' विभागात झोपडपट्टी परिसरांची संख्या मोठी आहे. सुमारे ८ लाख २६ हजार ७८४ एवढी लोकसंख्या असलेल्या या विभागातील ८५ टक्के लोक झोपडपट्टी परिसरांमध्ये राहतात. कचऱ्यापासून खतनिर्मिती करणारा प्रकल्प येथे कार्यान्वित करण्यात आला आहे. परिमंडळ - ५ चे उपायुक्त भरत मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली 'कॉर्पेोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी' अंतर्गत 'कमपोस्ट' या संस्थेचे सहकार्याने खत निर्मिती करणारा प्रकल्प यशस्वीपणे कार्यान्वित झाला आहे. सध्या दररोज ३० टन कचरा टाकण्यात येत आहे. या कचऱ्यापासून त्यापुढील ४८ तासात खत निर्मिती होत आहे. यानुसार दररोज साधारणपणे २२ टन एवढे खत तयार होत असून ते कोल्हापूर जिल्ह्यातील शेतांमध्ये वापरले जाते, असे किलजे यांनी सांगितले. शिवाजीनगर, बैंगनवाडी परिसरातील प्रकल्पाची दैनंदिन क्षमता ५० टन एवढी आहे. सध्या ३० टन एवढा कचरा दररोज वापरुन खत तयार केले जात आहे. पुढील १५ दिवसात या प्रकल्पाचा पूर्ण क्षमतेने वापर सुरु होऊन दररोज ५० टन कचरा या प्रकल्पात वापरला जाईल. प्रकल्पाची क्षमता दररोज १०० मेट्रीक टन पर्यंत वाढविण्याचे देखील प्रस्तावित आहे. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्याने कचऱ्यात ३० टनांची घट झाल्याचा दावा, प्रशासनाने केला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad