प्लास्टिक संकलन केंद्रांच्या माहितीसाठी 'टोल फ्री' क्रमांक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 May 2018

प्लास्टिक संकलन केंद्रांच्या माहितीसाठी 'टोल फ्री' क्रमांक


मुंबई - राज्य सरकारने प्लास्टिक बंदी लागू केली आहे. त्यांची अंमलबजावणी मुंबई महापालिकेकडून केली जात आहे. प्लास्टिक बंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शहरात जमा होणाऱ्या प्लास्टिकच्या संकलनासाठी केंद्रांची निर्मिती केली असून त्यांची माहिती देण्यासाठी टोल क्रमांक सुरू करण्यात आले आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण खात्याने प्लास्टिक बंदीचा निर्णय जारी केला आहे. प्लास्टिक व थर्माकोल अविघटनशील वस्तुंचे (उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी, साठवणूक) अधिसूचना, २०१८ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महापालिका कटीबद्ध आहे. त्यादृष्टीने सर्वस्तरीय कार्यवाही सुरु झाली आहे. प्रतिबंधित प्लास्टिक संकलनाकरिता ६५ ठिकाणी यापूर्वीच कचरा संकलन केंद्रे कार्यान्वित केली आहेत. पालिकेच्या मंड्यांमध्ये व अधिक वर्दळीच्या ठिकाणी ती ठेवली आहेत. याव्यतिरिक्त सोसायाट्यांच्या किंवा व्यवसायिक संघटनांच्या स्तरावर १० किलोपेक्षा अधिक प्लास्टिक संकलन करण्यात आल्यास, त्याबाबत १८००-२२२-३५७ या 'टोल फ्री' क्रमांकावर सकाळी ९ ते रात्री ९ या कालावधीत सूचना द्यावी, तसेच ते उचलून नेण्याची व्यवस्था देखील या टोल फ्री क्रमांकाच्या माध्यमातून केली जाईल, अशी माहिती सहाय्यक आयुक्त घनकचरा व्यवस्थापन किरण दिघावकर यांनी दिली. घनकचरा व्यवस्थापन खात्याचे उपायुक्त विश्वास शंकरवार यांच्या मार्गदर्शनानुसार काम होत असल्याचे ते म्हणाले. संकलित केलेले प्लास्टिक हे महापालिकेच्या कचरा वर्गीकरण केंद्रांमध्ये पाठविले जाईल. याठिकाणी वर्गीकरण झाल्यानंतर ते प्लास्टिक 'महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ' यांच्याकडे नोंदणीकृत असलेल्या अधिकृत संस्थेकडे पुनर्चक्रीकरणासाठी पाठविण्यात येणार आहे. सध्या महापालिका क्षेत्रात ३७ कचरा वर्गीकरण केंद्रे कार्यान्वित आहेत. याव्यतिरिक्त प्रतिबंधित प्लास्टिक बंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महापालिका क्षेत्रात सुमारे १०० ठिकाणी 'प्लास्टिक बॉटल क्रशिंग यंत्र' बसविण्याचे प्रस्तावित केल्याचे दिघावकर यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad