Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

'मरिन ड्राईव्ह' वरील झाडांना 'सॉल्ट स्प्रे' पासून वाचविण्यासाठी हिरवी जाळी


मुंबई - समुद्रकिना-याजवळील काही ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण भौगालिक परिस्थितीमुळे समुद्राच्या लाटा अधिक जोरात फुटतात. लाटा फुटल्यानंतर उडणारे पाण्याचे तुषार वाहत्या वा-यांसोबत उडतात. या उडणा-या तुषारांना 'सॉल्ट स्प्रे'असे म्हटले जाते. या 'सॉल्ट स्प्रे' चा अत्यंत प्रतिकूल परिणाम नुकतेच मूळ धरु पाहणा-या छोट्या रोपट्यांवर होत असतो. या रोपट्यांच्या पानांवर 'सॉल्ट स्प्रे' मधील मीठ साचते. याच मिठावर पावसाचे पाणी पडले की ते मीठ-युक्त पाणी झाड्यांच्या पानातून व मुळातून शोषले जाते, ज्याचा विषासारखा परिणाम रोपट्यांवर होतो. ज्यामुळे झाडांची रोपटी अशा वातावरणात तग धरत नाहीत. हे लक्षात घेऊन दक्षिण मुंबईतील नेताजी सुभाष मार्गावरील(मरिन ड्राईव्ह) दुभाजकांवर लावण्यात आलेल्या १२० शोभेच्या झाडांना वैशिष्ट्यपूर्ण हिरवी जाळी (Green-house Net) बसविण्यात आली आहे. या जाळीचे सकारात्मक परिणाम आता दिसून येत असून, ज्या झाडांना जाळी गुंडाळण्यात आली आहे, त्यांच्यावर 'सॉल्ट स्प्रे'चा प्रतिकूल परिणाम अत्यंत कमी होत आहे; अशी माहिती उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.

पर्यावरणाचे संवर्धन आणि सुशोभिकरण या दोन प्रमुख उद्देशांनी बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील विविध ठिकाणी झाडे लावली जातात. याच अंतर्गत रस्त्यांवरील दुभाजकांमध्येही झाडांची रोपटी लावली जातात. मात्र, समुद्रकिना-याजवळ अशी रोपटी लावतान ती रोपटी 'सॉल्ट स्प्रे' च्या टप्प्यात येत असतील, तर त्यांची अधिक काळजी घ्यावी लागते. दक्षिण मुंबईतील नेताजी सुभाष मार्गावरील (मरिन ड्राईव्ह) पोलिस जिमखान्यासमोरील समुद्रकिना-याचा भाग हा 'सॉल्ट स्प्रे'चा टप्पा आहे. त्यामुळे या परिसरातील झाडांची आणि विशेषकरुन छोट्या रोपट्यांची अधिक काळजी घ्यावी लागते.

मरिन ड्राईव्ह पोलिस जिमखान्यासमोरील वैशिष्ट्यपूर्ण समुद्रकिना-यामुळे पावसाळ्यादरम्यान अधिक वेगाने येणा-या लाटा आणि अधिक वेगाने वाहणारे वारे; याच्या एकत्रित परिणामामुळे समुद्राच्या लाटा देखील अधिक वेगाने येऊन या ठिकाणच्या किना-यावर फुटतात. ज्यामुळे या ठिकाणी समुद्राच्या खा-या पाण्याचे सूक्ष्म तुषार म्हणजेच 'सॉल्ट स्प्रे' मोठ्या प्रमाणात तयार होऊन ते वा-यासोबत जवळपासच्या परिसरात पसरतात. ज्यांचा प्रतिकूल परिणाम झाडांवर होत असल्याचे; तसेच 'सॉल्ट स्प्रे'च्या मा-यापुढे झाडांची रोपटी माना टाकत असल्याचेही महापालिकेच्या उद्यान विभागाच्या यापूर्वी निदर्शनास आले होते. यावर उपाय म्हणून गेल्या वर्षी झाडांच्या रोपट्यांना प्रायोगिक स्वरुपात हिरवी जाळी बसविण्यात आली होती. या प्रयोगाचे चांगले परिणाम दिसून आल्यानंतर या वर्षी 'सॉल्ट स्प्रे'च्या टप्प्यातील १२० झाडांना 'हिरवी जाळी' बसविण्यात आली आहे. या जाळीमुळे 'सॉल्ट स्प्रे'चा रोपट्यांवर होणारा प्रतिकूल परिणाम कमी झाला आहे, अशीही माहिती परदेशी यांनी दिली आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom