जोगेश्‍वरीतील पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी विशेष मोहिम हाती घ्या - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 October 2018

जोगेश्‍वरीतील पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी विशेष मोहिम हाती घ्या

- राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्या महापालिका अधिकार्‍यांना सुचना 
- महिन्याभरानंतर पुन्हा बैठक घेणार
मुंबई - जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रातील विविध भागांतील पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी महिनाभर विशेष मोहिम हाती घेण्यात यावी, अशी सुचना गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांना दिल्या. या मोहिमेनंतर पुन्हा एकदा बैठक घेण्यात येईल, असे आश्‍वासनही त्यांनी रहिवाशांना दिले. त्याचबरोबर वेरावली रिझर्व वायरमधील पाण्याची लेवल निट ठेवावी, अशी सुचनाही त्यांनी यावेळी महापालिकेच्या अधिकार्‍यांना केली. 

जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रातील काही भागांंमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुंबई महानगरपालिकेकडून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी विविध सोसायट्यांकडून राज्यमंत्री वायकर यांच्याकडे सातत्याने करण्यात येत होत्या. त्यामुळे यासंदर्भात वायकर यांनी शुक्रवारी जोगेश्‍वरी येथील कार्यालयात अधिकारी तसेच रहिवाशी यांच्या सोबत संयुक्त बैठक घेतली होती. या बैठकीला नगरसेवक प्रविण शिंदे, बाळा नर, रेखा रामवंशी, मुंबई महानगरपालिकेचे जलअभियंता तवाडीया, राठोड, एमएमआरडीएचे अधिकारी तसेच रहिवाशी मोठयासंख्येने उपस्थित होते. 

यावेळी जलअभियंता तवाडीया यांनी, मागील वर्षी तलावांमध्ये १४ लाख ३४ हजार इतका पाणी साठी होता. यंदा १३ लाख १७ हजार इतका पाणी साठा असल्याने मुंबईकरांना दरदिवशी सुरळीत पाणी पुरवठा व्हावा यासाठी १ ऑक्टोबरलाच जलविभागाकडून पाणी पुरवठयाचे नियोजन करण्यात आले आहे. तलावांतील पाण्याचा साठयाचा आढावा घेऊन दरमहिन्याला पहिल्या आठवडयात पाण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. 

गेल्या काही महिन्यांपासून एमएमआरडीए, पीपीडायस कंम्पाऊंड, जोगेश्‍वरी गुंङ्गा, पंपहाऊस, शिवटेकडी, पुनमनगर, बांद्रा प्लॉट आदी, आरेतील रॉयल पाम, मोराचा पाडा, मयुर नगर, एसआरपी कॅम्पमधील इमारतींना पाणी पुरवठा होत नसल्याची तक्रारी नगरसेवक तसेच स्थानिक रहिवाशांनी राज्यमंत्री वायकर यांच्या समोर मांडली. यानंतर एमएमआरडीएच्या अंतर्गत असलेल्या ७ इमारतींना येत्या आठवडयाभरात पाण्याचे कनेक्शन देण्यात येईल, असे आश्‍वासन एमएमआरडीएच्या अधिकार्‍यांनी दिले. तर पीपीडायस कंम्पाऊंड तसेच जोगेश्‍वरी गुंङ्गा येथील रहिवाशांसाठी नविन पाण्याची पाईप लाईन टाकण्याचे काम पुर्ण झाले असून जलजोडणीचे काम महिन्याभरात पुर्ण करण्यात येणार असल्याचे आश्‍वासन महापालिकेच्या अधिकार्‍यांनी दिले. पूनम नगर वसाहतीमध्ये गटार, सिव्हरलाईन, पेवर ब्लॉक्स तसेच कलरचे काम एमएमआरडीएतर्ङ्गे करण्यात येणार असून लवकरच याचे काम सुरू करण्यात येईल, असे आश्‍वासनही एमएमआरडीएच्या अधिकार्‍यांनी राज्यमंत्री वायकर यांना दिले. 

बांद्रा प्लॉट येथे मोठ्याप्रमाणात चोरुन पाण्याचे कनेक्शन देण्यात आले आहे. त्यासंदर्भात महापालिकेच्या अधिकार्‍यांनी एक ड्राईव्ह घ्यावा. यात जे कनेक्शन चोरुन दिली असतील, असे आढळून येईल ती तात्काळ तोडून त्या रहिवाशांना अधिकृत कनेक्शन द्यावेत, अशी सुचनाही राज्यमंत्री वायकर यांनी महापालिकेच्या अधिकार्‍यांना दिल्या. तसेच आरेतील पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी विशेष मोहिम हाती घेण्यात यावी, त्यानंतर महिन्याभरानंतर पुन्हा बैठक घेण्यात येईल, असे आश्‍वासनही वायकर यांनी उपस्थित रहिवाशांना दिले.

Post Bottom Ad