Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

भाजपा-सेनेला पराभूत करण्यासाठी कॉंग्रेसने त्यांच्या पराभूत जागा द्याव्यात - आंबेडकर


मुंबई - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपा - शिवसेनेला पराभूत करण्यासाठी 
काँग्रेस ज्या जागांवर पराभूत होते त्यापैकी १२ जागा आम्हाला द्या. त्या जागेवर आम्ही आमचे उमेदवार उभे करून निवडून आणू. भाजपा शिवसेनेला पराभूत करण्यासाठी काँग्रेसला मदत करू असे काँग्रेसला सांगितले. मात्र काँग्रेसकडून अद्याप याची दखल घेण्यात आली नाही, अशी माहिती भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिली. यावेळी आम्ही महाआघाडीसाठी तयार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. 

भारिपच्या कार्यालयात पत्रकार परिषदेत आंबेडकर बोलत होते. यावेळी बोलताना आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीने आम्ही कुठलीही आघाडी केली नाही. मात्र भाजप-सेनेला पराभूत करण्यासाठी मी काँग्रेसला आघाडी करण्यासाठी एकत्र बसू असे सांगितले होते. मात्र तेच आले नाहीत. त्यामुळे आम्ही एमआयएमने दिलेला हात स्विकारला. तसेच २००४ ते २०१४ पर्यंत काँग्रेस पक्ष ज्या २२ जागांवर पराभूत होत होता. त्यापैकी त्या १२ जागा आम्हाला द्या असा प्रस्ताव आम्ही त्यांना दिला. तसेच कोणत्या १२ जागा द्यायच्या हे देखील त्यांनीच ठरवून द्यावे असे काँग्रेसला कळविले. त्यावर त्यांच्या नेत्यांनी चर्चा करून कळवतो असे सांगून अद्याप फोन केला नसल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. 

सध्या डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण वाढत चालली आहे याला सर्वस्वी संघ आणि भाजपाचे चुकीचे धोरण जबाबदार असल्याची टीका करत ज्यांनी इतर मार्गाने जी संपत्ती कमावली आहे अशी ३ लाख ३ हजार ४०० कुटुंबांपैकी ७५ हजार कुटुंब आता हा पैसा डॉलरमध्ये रुपांतरीत करत भिती पोटी आता देश सोडून जात आणि याला सरकारचे हे चुकीचे धोरणच कारणीभूत असल्याचे प्रकाश आंबेडकर आहेत तसेच ही थलांतरीत होणारी कुटुंब हिंदू असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. तसेच या अशा लोकांमुळे सध्या डॉलरचे डिमांड वाढले असून, रुपयाची किंमत कमी झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

हे सरकार पुन्हा सत्तेत आले तर या ३ लाख ३ हजार ४०० कुटुंबांपैकी किती कुटुंबे भारतात राहतील ही देखील शंका आहे. तसेच या असल्या चुकीच्या धोरणामुळे पुन्हा एकदा सोनं गहाण ठेवावे लागते का? अशी भिती वाटू लागल्याचे प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणालेत. तसेच २०१८ ला फॉरेन्स एक्सचेंज ४२६ कोटी डॉलर होते ते जून २०१८ ला ३८०.७ कोटी डॉलरवर खाली आले आहे. तसेच आता या देशातील ५० हजार कोटी रुपये डॉलरमध्ये रुपांतरीत केले जाऊ शकतील अशी शक्यता आहे आणि तसे झाले तर डॉलरची किंमत १०० रुपयांपर्यंत जाऊ शकते असे देखील प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणालेत.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom