पेट्रोल पंपाचा स्लॅब कोसळून दोन जण जखमी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पेट्रोल पंपाचा स्लॅब कोसळून दोन जण जखमी

Share This

मुंबई - चेंबूरमध्येच पेट्रोल पंपाचा स्लॅब कोसळून दोन जण जखमी झाले. त्यांना जवळच्या सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दुपारी साडेबाराच्या दरम्यान उमरशी बाप्पा चौकाजवळ असलेल्या छगन मीठा पेट्रोल पंपाचा स्लॅब अचानक कोसळला. या घटनेमध्ये एक पेट्रोल पंपावरील कर्माचरी तर दुसरा पेट्रोल भरण्यासाठी आलेला बाईकस्वार गंभीर जखमी झाला आहे. लालचंद ढोलपुरिया आणि जतीन मंडलिक असी जखमींची नावे आहेत. जखमींवर सध्या लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages