अंगणवाडी सेविकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेऊ - अमृता फडणवीस - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 April 2019

अंगणवाडी सेविकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेऊ - अमृता फडणवीस


मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुंबई पालिका शाळेत पोषण आहार पुरवणाऱ्या महिलांच्या प्रश्नासंदर्भात पालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतली. अंगणवाडी सेविकांच्या समस्या सोडवण्यासाठीदेखील प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन अमृता फडणवीस यांनी दिलं. पोषण आहार पुरवणाऱ्या महिलांच्या प्रश्नांनंतर अंगणवाडी सेविकांचे प्रश्न सोडवण्यासाठी देखील अमृता फडणवीस पुढाकार घेणार आहेत.

मुंबई पालिका शाळेत पोषण आहार पुरवणाऱ्या महिलांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस धावून आल्यात. या महिलांचं वेतन थकलेलं होतं, याशिवाय पोषण आहाराच्या टेंडरबाबतही अडचणी होत्या. यासाठी अमृता फडणवीस यांनी मुंबई पालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतली. 

यावेळी अमृता फडणवीस म्हणाल्या, “पालिका शाळेत ज्या महिला अन्नपुरवठा करतात त्यांचे काही प्रश्न होते, टेंडरबाबतीतही त्यांचे काही मुद्दे होते. या महिलांना वेतन वेळेवर मिळणं आणि टेंडर प्रक्रियेतील काही महत्त्वाचे मुद्दे आम्ही आयुक्तांसमोर मांडले. काही अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांबाबत आयुक्तांनीही सकारात्मक भूमिका घेतली. महिला सशक्तीकरणाबाबतही आयुक्त लवकरच निर्णय घेणार आहेत”

Post Bottom Ad