मुंबई दि २७: सोमवार, दि.२९ एप्रिल रोजी सकाळी ७:०० ते सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत मुंबई शहर जिल्हयात मतदान होत आहे. ही मतदानाची संधी ५ वर्षानंतर येणारी आहे त्यामुळे सुट्टीचा आनंद घेण्यापूर्वी मतदानाचा बहुमुल्य हक्क बजावा असे आवाहन मुंबई शहरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी मतदारांना केले आहे.
मुंबई शहर जिल्हयात १० विधासभा मतदार संघ आहेत. त्यात वरळी, शिवडी, भायखळा, मुंबादेवी, मलबार हिल व कुलाबा हे ६ मतदार संघ ३१-मुंबई दक्षिण मतदारसंघात येतात. धारावी, सायन कोळीवाडा, वडाळा व माहिम या ४ विधानसभा मतदान संघासह मुंबई उपनगर जिल्ह्यातील अणुशक्तीनगर आणि चेंबुर हे दोन विधानसभा मतदारसंघ ३० मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात येतात.
मतदान ओळखचिठ्ठी (Voter Slip) व मदत कक्ष (Help Desk) -
मतदान करण्यासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. निवडणूक यंत्रणेमार्फत प्रत्येक मतदाराची मतदान चिठ्ठी (Voter Slip) घरपोच पोहचविण्याची व्यवस्था केली आहे. ज्यात मतदाराच्या फोटोसह मतदार यादीचा भाग क्रं, अनुक्रमांक व मतदान केंद्राचा पत्त दर्शिवला आहे. तथापि, बंद घरे किंवा स्थलांतरित मतदान यांना ती पोहचली नसेल तर मतदानाच्या दिवशी मतदान यादीत नाव शोधण्याकरीता मतदान केंद्राच्या बाहेर मदत कक्ष (Help Desk) स्थापन केला आहे.
मतदानासाठी ११ ओळखपत्र पुरावे -
मतदान करण्यासाठी मतदान चिठ्ठी पुरेशी नाही. मतदान ओळखपत्र पाहिजे. मतदान ओळखपत्र नसले तरी मतदार मतदान करु शकतात. त्यासाठी निवडणूक आयोगाने निर्देशित केलेले १) पासपोर्ट, २)वाहन चालविण्याचा परवाना, ३) केंद्र शासन/ राज्य शासन/सार्वजनिक उपक्रम/स्थानिक स्वराज्य संस्था/ यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिलेले ओळखपत्र, ४) बँक किंवा पोस्टाचे छायाचित्र असलेले पासबूक, ५) आयकर विभागाकडील पॅन ओळखपत्र, ६) जनगणना आयुक्त यांनी दिलेले ओळखपत्र, ७) रोजगार हमी योजनेमधील जॉबकार्ड, ८) कामगार मंत्रालय यांच्याकडील आरोग्य कार्ड, ९) निवृत्त कर्मचाऱ्यांचे छायाचित्र असलेले पेन्शन पासबुक किंवा पेन्शन पेमेंट ऑर्डर, १०) आमदार/खासदार यांचे ओळखपत्र ११) आधार कार्ड ओळखपत्र ग्राहय धरले जातील.
क्रिटीकल मतदान केंद्र -
जिल्हयात कोणतेही क्षेत्र वा मतदान केंद्र व्हलरेबल नाही. ३५७ केंद्र हे Critical मतदान केंद्र घोषित आहेत. त्यापैकी २६० मतदान केंद्रावर Web Casting केली जाणार आहे.
टोल फ्री क्रमांक व संकेतस्थळ -
निवडणूक व मतदानबाबत अधिक माहितीसाठी १९५० हेल्पलाईनवर संपर्क करा किंवा किंवा https://www.nvsp.in/ व ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळांना भेट द्या.
जिल्हयात २६०१ मतदान केंद्र -
या १०-विधानसभा मतदारसंघात मिळून एकूण २६०१, तर मुंबई उपनगर शहरातील अणुशक्तीनगर-२५७ व चेंबूर-२९२ असे मतदान केंद्रे आहेत. ३०-मुंबई दक्षिण मध्य मध्ये १५७२ व ३१-मुंबई दक्षिण मध्ये १५७८ मतदान केंद्रे आहेत.
क्रिटीकल मतदान केंद्र -
जिल्हयात कोणतेही क्षेत्र वा मतदान केंद्र व्हलरेबल नाही. ३५७ केंद्र हे Critical मतदान केंद्र घोषित आहेत. त्यापैकी २६० मतदान केंद्रावर Web Casting केली जाणार आहे.
टोल फ्री क्रमांक व संकेतस्थळ -
निवडणूक व मतदानबाबत अधिक माहितीसाठी १९५० हेल्पलाईनवर संपर्क करा किंवा किंवा https://www.nvsp.in/ व ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळांना भेट द्या.
पोलीस यंत्रणा -
मुंबई शहर जिल्हयासाठी पुरेशा पोलीस बंदोबस्त आहे. यात १२-पोलिस उप आयुक्त, ४६-सहाय्यक पोलिस आयुक्त, १००८-वर्ग १ व २ चे अधिकारी, ८५७९ पोलिस कर्मचारी, तसेच ४-CPMS व ४-SRPF Unit व २३१०-होमगार्ड यांचा समावेश आहे.
पुरेशी मतदान यंत्रे / वाहनांवर जीपीएस यंत्रणा -
निवडणुकीसाठी पुरेशी मतदान यंत्रे उपलब्ध आहेत. एकूण राखीव यंत्रे मिळून बॅलेट युनिट्स ५६३८ (११७%), कंट्रोल युनिट्स ३७६४ (११४%), व ४२७३ (१२९%) व्हीव्हीपॅट आहेत. मतदार संघनिहाय ३०-मुंबई दक्षिण मध्य बॅलेट युनिट्स ३६५५, कंट्रोल युनिट्स १७९५ व १९७९ व्हीव्हीपॅट आहेत. तर ३१-मुंबई दक्षिण मध्ये बॅलेट युनिट्स १८७०, कंट्रोल युनिट्स १८०५ व २०९० व्हीव्हीपॅट आहेत.
ही मतदान यंत्रे ने-आण करणाऱ्या वाहनांवर जीपीएसद्वारे सातत्याने लक्ष ठेवण्यात येईल. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जीपीएस मॉंनिटरिंग कक्ष कार्यान्वित केला आहे.
१५ हजार अधिकारी/कर्मचारी कार्यरत -
मुंबई शहर जिल्हयातील सर्व विधानसभा मिळून १५ हजार अधिकारी/कर्मचारी कार्यरत आहेत. त्यातील प्रत्यक्ष मतदान केंद्रावर कामे करणाऱ्या सर्व संबंधितांना ३ टप्प्यात त्यासंबंधिचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रत्येक मतदान केंद्रांवर १ मतदान केंद्राध्यक्ष, १ प्रथम मतदान अधिकारी, २ इतर मतदान अधिकारी असे एकूण ४ मतदान अधिकारी असतील. सर्व संबंधित अधिकारी/कर्मचारी यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
पथकांची बारकाईने नजर -
या मतदारसंघांमध्ये एकुण ९० स्थिर सर्व्हेक्षण पथके, १२० भरारी पथके, ९० व्हिडीओ सर्व्हेक्षण पथके, २० सूक्ष्म निरीक्षक, १९७ झोनल अधिकारी ३२९ आहेत. ही यंत्रणा असून आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याकडे काटेकोरपणे लक्ष ठेवीत आहे.
वाहन व्यवस्था -
जिल्हयात निवडणूक विषयक कामासाठी पुरेशे वाहन व्यवस्था आहेत. यात ५६३ बसेस असुन त्यापैकी ३८५ बेस्ट बसेस तर १७८ इतर खाजगी बसेस आहेत. ४७१ टॅक्सी, १३६ जीप व ३६ टेम्पो ट्रॅव्हर अशी वाहने निवडणूक कामासाठी आहेत.
१८ कोटी संशयित रक्कम जमा तर १५ आचार संहिता भंगाचे गुन्हे -
मुंबई शहर जिल्हयात आतापर्यंत १८ कोटी १४ लाख ८७ हजार रुपये संशयित रक्कम जमा झाली असुन त्यातील ३०-मुंबई दक्षिण मध्य मध्ये ३ कोटी २८ लाख २५ हजार व ३१-मुंबई दक्षिण मध्ये १४ कोटी ८६ लाख ६२ हजार रक्कम आहे.
तसेच आचार संहितेचेही एकुण १५ गुन्हे दाखल झाले असुन ते अनुक्रमे ७ व ८ असे आहेत.
स्विप उपक्रम
स्विप मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मुंबई शहर जिल्हा निवडणूक विभागाने विविध उपक्रम राबविले व त्याव्दारे मतदान जनजागृती केली. यात उल्लेखनिय असे काही उपक्रम पुढीलप्रमाणे –
१) युवा वर्ग आणि आयपीएल हे समीकरण पाहता वानखेडे स्टेडियमवर जनजागृतीचे फलक व स्टँन्डीव्दारे जाहिराज करुन जनजागृती करण्याचा प्रयत्न
२) मुंबई शहर जिल्हयातील मतदारांमध्ये विविध ठिकाणी फ्लॅश मॉबव्दारे मतदान करा हा संदेश पोहचविण्याचा प्रयत्न
३) नवमतदारांसाठी माय फस्ट व्होट सेल्फी हा अभिनव उपक्रम जाहीर
४) दिव्यांग मतदारांसाठी विविध सुविधा त्यांच्या घरुन मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाणे आणि वापर घरी सोडणे यासाठी हेल्पलाईन सुरु केली. यात २२६६ पैकी १९७८ जणांनी प्रत्यक्ष व २२० जणांनी PWD App व्दारे नोंदणी केली आहे. ८०० जणांनी वाहन व्यवस्थेसाठी विनंती केली आहे. त्याची व्यवस्था आम्ही करणार आहोत. या वाहनाला मतदान केंद्रावरील १०० मीटरचे बंधन नाही. १४-व्हिल चेअर लिप्ट होणाऱ्या व ६ PWD Friendly बसेसची व्यवस्था NGO मार्फत करण्यात आलेली आहे.
भारत निवडणूक आयोगाने ऑस्ट्रेलियन व कॅनेडियन हाय कमिशन यांना निवडणूक यंत्रणा व व्यवस्था व प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पाहण्यासाठी मुंबईत निमंत्रित केले आहे. मुंबई शहर जिल्हयात त्यांची ८ जणांची टिम या सर्व बाबी पाहणार आहे. त्यांना सखी केंद्रही दाखविण्यात येईल.