मुंबई, दि.28: मुंबई शहर जिल्हयात दि. 29 एप्रिल 2019 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणूकीत कामगारांना मतदान करता यावे यासाठी भरपगारी सुट्टी देण्याचे निर्देश कामगार विभागाने दिले आहेत. त्यानुसार मुंबई शहर जिल्हयातील सर्व संबंधित आस्थापनांनी कामगारांना मतदासाठी भरपगारी सुट्टी द्यावी असे निर्देश मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिली आहे.
मुंबई दक्षिण व मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघामध्ये अत्यावश्यक सेवा देणाऱ्या दुकाने व आस्थापने वगळून इतर सर्व आस्थापना सोमवार दि. 29 एप्रिल 2019 रोजी सकाळी 7:00 ते सायंकाळी 6:00 या वेळात बंद ठेवण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग व्दारा दि.03/04/2019 च्या अधिसूचना काढण्यात आली आहे. तसेच त्या दिवशी बंद राहीलेल्या दुकाने/आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येऊ नये असेही या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. या संदर्भात काही तक्रारी आल्यास संबंधित आस्थापनांविरुध्द लोकप्रतिनिधी अधिनियमान्वये कठोर कारवाई होऊ शकते, याची गांभिर्याने नोंद घ्यावी असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.