रेपो दरात पाव टक्क्यांची कपात, गृहकर्जे होणार स्वस्त ? - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 June 2019

रेपो दरात पाव टक्क्यांची कपात, गृहकर्जे होणार स्वस्त ?


नवी दिल्ली – रिझर्व्ह बँकेने गृहकर्ज घेणाऱ्यांना काही अंशी दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. आज रिझर्व्ह बँकेचे तिमाही पतधोरण जाहीर करण्यात आले. आरबीआयच्या पतधोरण आढावा समितीने आज रेपो दरात पाव टक्क्यांची कपात केली आहे. त्यामुळे रेपो दर ६.० टक्क्यांवरून ५.७५ टक्क्यांवर आले आहे. यामुळे आगामी काळात गृह, वाहन अथवा अन्य कर्जे स्वस्त होणार आहेत. भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय) पत धोरण आढावा जाहीर केला असून, त्या नुसार रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात केली आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे गृहकर्जे स्वस्त होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

रेपो दरावर आधारित रिझर्व्ह बँक बँकांना फंड वितरीत करत असते. रेपो दरात कपात झाल्याने बँकांना आरबीआयकडून स्वस्त दरात निधी उपलब्ध होऊ शकतो. या मुळे बँका गृहकर्जे, कार लोनसह इतर कर्जे कमी व्याजदरात देऊ शकणार आहेत. आरबीआयच्या या निर्णयामुळे नवे कर्ज स्वस्त होणार आहे, तर कर्जे घेतलेल्या लोकांच्या हफ्त्याच्या रकमेत कपात किंवा रिपिटेड कालावधीत कपातीचा फायदा होऊ शकतो. तथापि, पतधोरण समितीने आपल्या धोरणाचा रोख तटस्थतेवरून तो लवचिक पातळीवर आणला आहे. महागाई दरात घट झाल्याने पतधोरण समिती पतधोरणाच्या स्थितीबाबत आपला 'तटस्थ' दृष्टीकोन बदलू शकते, असे तज्ज्ञांनी आपले मत मांडताना म्हटले होते.

सलग तिसऱ्यांदा रेपो दरात कपात -
आरबीआयचे चालू वित्तीय वर्षाचे हे दुसरे तिमाही पतधोरण आहे. आरबीआयने या पूर्वी एप्रिल महिन्यात रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात केली होती. तसेच आरबीआयने या पूर्वी तीन वेळा आपल्या पतधोरणात जैसे थे स्थिती ठेवली होती.

Post Bottom Ad