शिवाजी पार्क येथे झालेल्या शपथविधी समारंभात मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासमवेत एकनाथ संभाजी शिंदे, सुभाष राजाराम देसाई, जयंत राजाराम पाटील, छगन चंद्रकांत भुजबळ, विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात, नितीन काशिनाथ राऊत यांनी राज्यपालांकडून मंत्रीपदासाठी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. मुख्य सचिव अजोय मेहता यांनी शपथविधी सोहळ्याचे संचलन केले.
आजच्या शपथविधी कार्यक्रमास विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, खासदार शरद पवार, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनोहर जोशी, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, खासदार सुप्रिया सुळे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, माजी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, तामिळनाडूचे माजी उप मुख्यमंत्री एम.के. स्टालिन, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यासह राज्यातील खासदार, आमदार, विविध राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते, देशभरातून विशेष निमंत्रित करण्यात आलेले सर्व क्षेत्रातील सन्माननीय अतिथी उपस्थित होते.