Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

पालिकेत भाजप पहारेकर्याच्या भूमिकेत


मुंबई - सत्ता स्थापनेवरुन शिवसेनेने भाजपला कोंडीत पडकले असून मुख्यमंत्री शिवसेनेचाच अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचा अन्यथा युती तुटली असा इशाराच शिवसेनेने भाजपला दिला आहे. शिवसेनेने महायुतीचा हात सोडला, तर शिवसेनेला मुंबई महापालिकेत परिणाम भोगावे लागतील, असे चित्र निमाॅण झाले आहे. दरम्यान, शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीची साथ घेऊन राज्यात सत्ता स्थापन केलीच, तर मुंबई महापालिकेत विरोधी पक्षाच्या बाकावर बसण्याची तयारी भाजपने केली आहे. पालिका प्रशासन व सत्ताधारी शिवसेनेच्या प्रत्येक कामावर भाजपची पहारेकर्याची नजर असेल. तसेच करदात्या मुंबईकरांविरोधीतील निणॅय, भ्रष्टाचार यावर पहारेकरी म्हणून भाजप नगरसेवकांची कटाक्षाने नजर असेल, असा इशारा पालिकेतील भाजप गटनेते मनोज कोटक यांनी सांगितले.

२२ नोव्हेंबरपयॅंत महापाैर पदाची निवडणूक होणार आहे. पालिकेतील भाजपचे संख्याबळ ८३ असून शिवसेनेचे संख्याबळ ९४ आहे. राज्यात शिवसेनेने राजकीय गणित बिघडवले, तर मुंबई महापालिकेत शिवसेनेचे गणित भाजप बिघडवणार अशा प्रकारची खेळी भाजपकडून खेळली जाऊ शकते. भाजप नगरसेवकांची संख्या ८३ वरुन ९५ वर घेऊन जाणे भाजपसाठी काहीच अडचणीचे ठरणार नव्हते. त्यामुळे भाजपचे संख्याबळ वाढले, तर भाजप महापाैर पदाचा दावाही करु शकते, ही शक्यता नाकारता येत नव्हती. दरम्यान, पालिकेत विरोधी पक्षात बसून शिवसेनेच्या कामाकाजावर लक्ष ठेवणे, असा निणॅयच भाजप पक्षश्रेष्ठींनी घेतल्याचे समजते.
विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि भाजपचे १०५, तर शिवसेनेचे ५6 उमेदवार निवडूनही आले. बहुमत कुठल्याही राजकीय पक्षाला न मिळाल्याने शिवसेनेने हीच ती वेळ म्हणत भाजपची कोंडी करण्यास सुरुवात केली. अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागली. सत्ता स्थापनेबाबत शिवसेना-भाजपमध्ये रस्सीखेच सुरु आहे. शिवसेनेने पाठित खंजीर खुपसला, तर शिवसेनेला मुंबई महापालिकेतील सत्तेपासून दूर जावे लागेल, अशी रणनिती भाजपकडून आखली जाऊ शकते, याबाबत योग्य वेळ आल्यास जाहीर केले जाईल, असेही कोटक म्हणाले. 

मुंबई महापालिकेत शिवसेनेचे संख्याबळ 94, तर भाजपचे 83, काँग्रेसचे 29, राष्ट्रवादी काँग्रेसचे 9, समाजवादी 6, एमआयएम 2, मनसे 1, अपक्ष 3 , तर पाच नगरसेवक जातप्रमाणपत्रात बाद ठरले आहे. त्यामुळे सध्या पालिकेत सवॅपक्षीय 222 नगरसेवक असून शिवसेना खालोखाल भाजपचे जादा नगरसेवक आहेत. त्यामुळे शिवसेनेने राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्ता स्थापन केली, तर मुंबई महापालिकेत भाजप विरोधी पक्षाच्या भूमिकेत असेल, असा इशारा कोटक यांनी दिला आहे. 

दरम्यान, मुंबईत पालिकेच्या माध्यमनातून कामे करणार्या कंत्राटदारांवर प्राप्तीकर विभागाकडून छापे मारले जात आहे. त्यामुळे पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचे धाबे दणाणले आहेत. त्यात भाजप विरोधी पक्षात बसल्यानंतर पालिकेतील प्रत्येक कामावर भाजपची पहारेकरी म्हणून नजर असेल, असा स्पष्ट इशाराच भाजप नेत्यांनी दिल्याचे समजते.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom