Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

अयोध्या प्रकरणाचा निकाल काहीही लागो, शांतता राखा ! - नसीम खान


मुंबई - अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशिदीच्या जमीन वादावर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर काही समाजविघातक लोक समाजात अशांतता पसरवण्य़ाचा प्रयत्न करतील मात्र त्याला बळी न पडता निकाल काहीही आला तरी शांतता राखावी, असे आवाहन काँग्रेस नेते माजी मंत्री नसीम खान यांनी केले आहे.

इद-ए-मिलादुन्नबीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज कमिटीची बैठक घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये पार पडली. या बैठकीत मुस्लीम संघटनांच्या १०० पेक्षा जास्त प्रतिनिधींनी भाग घेतला. या बैठकीत मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, एमएमआरडीएचे अधिकारी, पोलीस उपस्थित होते. अयोध्याप्रकरणी न्यायालयाचा जो निर्णय येईल त्याचा सर्वांनी सन्मान केला पाहिजे. परंतु काही समाजविघातक शक्ती देशाची शांतता तसेच हिंदू-मुस्लीम एकतेला नख लावण्याचा प्रयत्न करू शकतात त्यांच्या या प्रयत्नांना बळी पडू नका, असे आवाहन माजी मंत्री नसीम खान यांनी केले आहे. १७ नोव्हेंबरपूर्वी रामजन्मभूमी-बाबरी मशिद जमीन प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या निकालानंतर देशात काही उद्भवणा-या परिस्थितीवरही या बैठकीत चर्चा करण्यात आली. सर्वांनी शांतता राखावी असेही नसीम खान म्हणाले.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom