वैयक्तिक करदात्यांसाठी अर्थसंकल्पात नवीन कर रचना - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

वैयक्तिक करदात्यांसाठी अर्थसंकल्पात नवीन कर रचना

Share This

नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वैयक्तिक करदात्यांसाठी अर्थसंकल्पात नवीन कर रचना सादर केली आहे. त्यात कर कपात करण्यात आली असून, नवीन कर रचना तयार केली आहे. गेल्या वर्षी बजेटमधील कर रचना सुद्धा कायम राहणार असून, नवीन कर रचना निवडण्याचा पर्याय सरकारने उपलब्ध करून दिला आहे. मात्र नव्या कर रचनेत कर कमी करण्यात आला असला तरी, करदात्याचे एकूण उत्पन्न त्यात ग्राह्य धरले जाणार आहे. या अंतर्गत विवरण सादर करताना कर वजावटीचा लाभ घेता येणार नाही.

मध्यमवर्गीयांच्या हाती पैसा राहावा या दृष्टीनं सरकारनं कर रचनेत बदल करून ७.५ ते १० लाख उत्पनावर १५ टक्के प्राप्तिकराचा नवा कर स्तर बजेटमध्ये जाहीर केला. नव्या कर रचनेत ५ लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त आहे. ५ ते ७.५ लाखांच्या उत्पन्नावर १० टक्के, ७.५ ते १० लाखांवर १५ टक्के, १० ते १२.५ लाखांवर २० टक्के कर आकारला जाणार आहे. मागील वर्षी ५ ते १० लाखांच्या उत्पन्नावर २० टक्के, १० ते १५ लाखांवर ३० टक्के होता. मात्र या नव्या कर रचनेत करदात्याने कर विवरणपत्र सादर केले तर, त्याला कर वजवटींचा घेता येणार नाही. म्हणजे लाभांशातून मिळणारे उत्पन्न करपात्र होईल. त्यामुळे नव्या कर रचनेचा लाभ घेताना करदात्याला जादा प्राप्तिकर द्यावा लागेल.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages