
मुंबई: पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तरुणीला जवळ बोलावून कारचालकाने तिच्यासमोरच अश्लील चाळे केल्याचा घृणास्पद प्रकार घाटकोपरमध्ये घडला. टिळकनगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करीत तत्काळ बिठू पालसिंग पारचा या विकृत कारचालकाला अटक केली आहे.
घाटकोपर पूर्वेकडील राजावाडी रोडवरून शनिवारी सायंकाळी बिठू हा कार घेऊन जात होता. याचवेळी या ठिकाणी उभ्या असलेल्या २१ वर्षीय तरुणीवर त्याची नजर पडली. त्याने कार रस्त्याच्या कडेला घेतली आणि पत्ता विचारण्याचा बहाणा करून या तरूणीला ज वळ बोलावले. ही तरुणी जवळ येताच बिठू याने तिच्यासमोर अश्लील चाळे केले. त्याच्या या कृत्यामुळे सदर तरुणी हादरलीच. मात्र लगेचच स्वत:ला सावरत तिने धाडसाने बिठूला रोखण्याचा प्रयत्न केला मात्र तो तिथून पळून गेला.
दरम्यान, तरुणीने लगेचच टिळकनगर पोलीस ठाणे गाठून घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार नोंदवली. तिच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला व तपास सुरू केला. कारच्या क्रमांकावरून टिळकनगर पोलिसांनी पुढच्या काही तासांतच बिठू पालसिंग पारचा या आरोपीला शोधून काढले व बेड्या ठोकल्या.

ليست هناك تعليقات:
إرسال تعليق