मुंबईमधील शाळा आणि रेल्वे बंदच - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 January 2021

मुंबईमधील शाळा आणि रेल्वे बंदच


मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. मात्र एमएमआर रिजन मधील कोरोनाचा प्रसार तसेच ब्रिटनमधील आलेल्या नव्या स्ट्रेनचा आढावा घेऊन मुंबईमधील शाळा आणि लोकल ट्रेन सुरु करण्याचा निर्णय घेऊ अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

राज्य सरकारने येत्या २७ जानेवारीपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत बोलताना सुरेश काकाणी यांनी ही माहिती दिली. यावेळी बोलताना, राज्य सरकारने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला असला तरी मुंबईत मुंबईच्या बाजूच्या जिल्ह्यातून म्हणजेच एमएमआर रिजनमधून लोक, शिक्षक, विद्यार्थी येतात. त्याठिकाणच्या कोरोनाच्या फैलावाचा आढावा घेतला जात आहे. मुंबईत ब्रिटनमधून आलेल्या नव्या स्ट्रेनचे रुग्ण आढळून आले आहेत. ब्रिटनहून येणारी विमानेही सुरु झाली आहेत. त्यामधून आलेल्या प्रवाशाच्या माध्यमातून कोरोना पसरतो आहे का याचा पुढील १५ दिवस आढावा घेतला जाईल असे काकांनी याणी सांगितले.

मुंबईमधील कोरोना परिस्थितीचा आढावा महापालिका आणि राज्य सरकारमध्ये नुकताच घेण्यात आला. पुढील १५ दिवसानी पुन्हा आढावा घेतला जाईल. त्याबाबतचा अहवाल सरकारला सादर केला जाईल. त्यानंतरच राज्य सरकार लोकल ट्रेन सुरु करण्याचा निर्णय घेऊ शकेल असे काकाणी यांनी सांगितले. यावरून मुंबईमधील लोकल ट्रेन आणि शाळा बंदच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS