पालिका रुग्णालयातील सहयोगी प्राध्यापकांची १०० पदे भरणार  - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिका रुग्णालयातील सहयोगी प्राध्यापकांची १०० पदे भरणार 

Share This


मुंबई - मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागात ४० ते ५० टक्के पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे भरण्याचे काम महापालिका प्रशासनाने सुरु केले आहे. रिक्त पदांपैकी रुग्णालय, महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापकांची १०० पदे भरली जाणार आहेत. तास प्रस्ताव आज पालिकेच्या आरोग्य समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आल्याची माहिती आरोग्य समितीच्या अध्यक्षा प्रविणा मोरजकर यांनी दिली.

मुंबई महानगरपालिकेत टिचिंग आणि रुग्णांवरील उपचारांसाठी साहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक अशी २० ते २५ विषयांवरील पदे असतात. पालिका रुग्णालयांतील ३ मुख्य तसेच १६ सर्वसाधारण रुग्णालयातील सहयोगी प्राध्यापकांची १०५ पदे रिक्त आहेत. त्यापैकी १०० पदे भरावी, असा प्रस्ताव पालिका प्रशासनाने पालिकेच्या आरोग्य समितीत प्रस्ताव सादर केला. हा प्रस्ताव आज मंजूर करण्यात आला. ही पदे भरल्यास रुग्णसेवा अधिक गतीमान होणार आहे. सहयोगी प्राध्यापकांना सरासरी मासिक १ लाख ८२ हजार ते २ लाख २४ हजार १०० इतके मासिक वेतन दिले जाणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages