भूमाफियांचा बंदोबस्त केला जाणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 February 2021

भूमाफियांचा बंदोबस्त केला जाणार



मुंबई - घाटकोपर लिंक रोडवरील, मानखुर्द मंडाळा भंगार गोदामाला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेनंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर व उप महापौर अँड. सुहास वाडकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली. या दुर्घटनेमुळे येथील भूमाफिया टोळीचा सक्त बंदोबस्त करण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

आग लागलेल्या ठिकाणाची जागा जिल्हाधिकारी यांच्या अखत्यारीत येत असून याठिकाणी अवैधपणे ऑईलचा साठा करण्यात येत असल्याची माहिती महानगरपालिका एम -पूर्व विभाग कार्यालयाच्या वतीने तसेच स्थानिक नगरसेविकांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाला वेळोवेळी कळविण्यात आली असल्याचे महापौरांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने यापूर्वी बृहन्मुंबई महानगरपालिका व पोलिसांच्या मदतीने अनेक वेळा कारवाई सुद्धा झाली. परंतु कारवाईची पाठ फिरताच पुन्हा भूमाफिया तिथे सक्रिय होऊन अवैध अड्डे स्थापन करीत असतात. त्यातूनच आजची ही दुर्घटना घडली असल्याचे महापौर म्हणाल्या. या दुर्घटनेमुळे भूमाफिया टोळीचा सक्त बंदोबस्त करण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

"एम - पूर्व '' विभाग कार्यालयाचे सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी जेसीबी व इतर सर्व आवश्यक त्या साहित्यासह अग्निशमन दलाला सहकार्य करून आग विझविण्याचा प्रयत्न करीत आहेत. आग मानवी वस्तीमध्ये अधिक पसरू नये, यासाठी अग्निशमन दलाच्या वतीने अधिक खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती महापौरांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad