
मुंबई / भिवंडी - नोकरीचे आमिष दाखवून एका महिलेवर वारंवार बलात्कार करणाऱ्या बोगस पत्रकाराला भिवंडी पोलिसांनी अटक केली आहे. संबंधीत व्यक्तीवर नारपोली पोलीस ठाण्यात अत्याचारासह अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार एका व्यक्तीने पत्रकार असल्याचे सांगून, भिवंडी शहरात राहणाऱ्या एका ३५ वर्षीय महिलेशी ओळख निर्माण केली. त्यांनतर या महिलेला नोकरी लावून देतो असे अमिष दाखवले. त्यानंतर या अमिषाखाली त्या महिलेवर वारंवार बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी संबंधीत व्यक्तीवर नारपोली पोलीस ठाण्यात अत्याचारासह अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक केली आहे. मनोहर विशे (वय 35, रा. पुर्णा, भिवंडी ) असे अटक केलेल्या बोगस पत्रकाराचे नाव आहे.

ليست هناك تعليقات:
إرسال تعليق