
नवी दिल्ली - देशभरात मुलांसह दोन तृतीयांश नागरिकांमध्ये कोरोनाविरोधातील अँटिबॉडीज विकसित झाल्याचे आढळून आले आहे. ६ ते १७ वयोगटातील ५० टक्क्यांहून अधिक मुलांना कोविडचा संसर्ग झाला व त्यांच्यामध्ये अँटिबॉडीज विकसित झाल्या. मात्र, अद्यापही जवळपास ४० कोटी भारतीयांना कोरोनाचा धोका असल्याचेही समोर आले आहे.
देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली गेलेली असताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मंगळवारी चौथ्या राष्ट्रीय सेरो सर्व्हेचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले. आयसीएमआरचा चौथा सर्व्हे जून–जुलै दरम्यान करण्यात आला होता. २८ हजार ९७५ लोकांवर केल्या गेलेल्या सर्व्हेत ६ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांचा देखील समावेश करण्यात आला होता.
सर्व्हेमध्ये सहभागी ६७.६ टक्के लोकांमध्ये कोविड अँिटबॉडीज आढळून आल्या आहेत, म्हणजेच ते कोरोना संक्रमित झाले होते. या सर्व्हेमध्ये २८ हजार ९७५ लोकांना सहभागी करून घेतलं गेलं होतं. यामध्ये ६ ते ९ वर्षं वयोगटातील २ हजार ८९२ मुलं, १० ते १७ वयोगटातील ५ हजार ७९९ मुलं आणि १८ वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या २० हजार २८४ जणांचा समावेश होता. ६ ते ९ वर्षांच्या ५७.२ टक्के आणि १० ते १७ वर्षांच्या ६१.६ टक्के मुलांमध्ये कोरोना अँिटबॉडीज आढळल्या आहेत. तर, १८ ते ४४ वर्षांच्या ६६.७ टक्के, ४५ ते ६० वर्षांच्या ७७.६ टक्के आणि ६० वर्षांवरील ७६.७ टक्के लोकांमध्ये अँिटबॉडीज दिसून आल्या आहेत. सर्वेमध्ये सहभागी ६९.२ टक्के महिला आणि ६५.८ टक्के पुरुषांमध्ये अँिटबॉडीज आढळल्या आहेत, असे सर्व्हेमध्ये दिसून आले आहे.
प्राथमिक शाळा आधी सुरू करा -
व्हायरल इन्फेक्शनचा सामना मुले अधिक चांगल्या प्रकारे करू शकतात, त्यामुळे प्रथम प्राथमिक शाळा पुन्हा सुरू करण्यावर विचार करणे योग्य ठरेल, असे मत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं व्यक्त केलं आहे.

ليست هناك تعليقات:
إرسال تعليق