
लोकांनी प्लॅस्टिकचे झेंडे वापरू नयेत, यासाठी कारवाई करावी असे आदेश राज्यांना देण्यात आले आहेत. यासाठी राज्यांना आठवडाभर आधीच पत्र पाठविण्यात आले आहे. राष्ट्रीय ध्वजाचा अपमान न होण्यासाठी प्लॅस्टीकच्या ध्वजांची विक्री राज्य सराकारांना आता थांबवावी लागणार आहे. आपला राष्ट्रीय ध्वज सर्वांच्या हृदयात स्नेह, सन्मान आणि निष्ठा जागवतो. आस्थेचा विषय आहे. मात्र, तरी देखील लोकांबरोबरच सरकारी कार्यालयांतही याबाबत जागरुकता नसते. यामुळे राष्ट्रीय, सांस्कृतीक आणि खेळांच्या आयोजनाच्या ठिकाणी सर्रास प्लॅस्टीक ध्वज वापरला जातो. ते विघटनशील नसल्याने खूप काळ तसेच पडून राहतात, हे टाळा, असे मंत्रालयाने म्हटले आहे.
यामुळे राज्यांना आदेश देण्यात येत आहे की, जनतेकडून कागदी झेंड्यांचा वापर केला जावा. यासाठी योग्य ती कार्यवाही करावी. भारतीय ध्वज संहिता २००२ नुसार त्याचा वापर करावा. कार्यक्रम झाल्यावर हे झेंडे जमिनीवर फेकण्यात येऊ नयेत असेही म्हटले आहे.

ليست هناك تعليقات:
إرسال تعليق