तुंगा गावात आरोग्य केंद्र - पालिका करणार दोन कोटी ४० लाख रुपये खर्च - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

तुंगा गावात आरोग्य केंद्र - पालिका करणार दोन कोटी ४० लाख रुपये खर्च

Share This


मुंबई - चांदिवली जवळील तुंगा गावात दवाखाना आणि आरोग्य केंद्र बांधण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी महापालिका दोन कोटी ४० लाख रुपयांचा खर्च करणार आहे. दवाखान्याचे काम १६ महिन्याच्या काळात पूर्ण केले जाणार आहे. तसेच विक्रोळी येथील पार्कसाईट येथे सात मजल्यांचे ३० खाटांचे रुग्णालय उभारले जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव महासभेत मंजुरीसाठी मांडण्यात आला आहे.

तुंगवे गाव साकी विहार मार्ग या भागात वस्तीत राहाणारी लोकसंख्या मोठी आहे. येथे दवाखाना नसल्याने लोकांना दूरच्या दवाखान्यात जावे लागते. त्यामुळे या भागात दवाखाना आणि आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहे. येथे दवाखाना सुरु झाल्याने या भागातील नागरीकांना मोठा दिलासा मिळणार आहे. हा दवाखाना आणि आरोग्य केंद्र ३ हजार ९१२ चौरस फुटांच्या क्षेत्रफळावर असणार आहे. दवाखान्यात सर्व अत्यावश्‍यक सुविधाही उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.

विक्रोळी पार्कसाईट येथे सात मजली रुग्णालय -
मुंबई महापालिका विक्रोळी पश्‍चिमेकडील पार्कसाईट येथे सात मजली नवे रुग्णालय उभारणार आहे. ३० खाटांचे हे रुग्णालय असणार आहे. पालिका या रुग्णालयासाठी ३९ कोटी ३८ लाख रुपयांचा खर्च महापालिका करणार आहे. या भुखंडावरील अतिक्रमण हटवल्यानंतर या रुग्णालयाच्या बांधकामाचे कार्यादेश दिले जाणार आहेत.


ليست هناك تعليقات:

إرسال تعليق

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages