
साकीनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये खैरानी रोड येथे रात्री तीनच्या दरम्यान एका महिलेला मारहाण होत असल्याची तक्रार पोलीस कंट्रोलला प्राप्त झाली होती. त्यानुसार साकीनाका पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर जखमी महिलेला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी तिच्या गुप्तांगात लोखंडी सळी टाकण्यात आल्याने ती गंभीररीत्या जखमी असून तिची प्रकृती चिंताजनक आहे असा अहवाल पोलिसांना दिला आहे.
एकाला अटक -
या प्रकरणी साकिनाका पोलिसांनी मोहन चौहान या आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 307, 376, 323 आणि 504 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आणखी कोणी आरोपी आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत अशी माहिती पोलीस उपायुक्त महेश्वरी रेड्डी यांनी दिली.

ليست هناك تعليقات:
إرسال تعليق