अविघ्न पार्क आगीची चौकशी करून कडक कारवाई करणार - पालिका आयुक्त - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 October 2021

अविघ्न पार्क आगीची चौकशी करून कडक कारवाई करणार - पालिका आयुक्त


मुंबई - मुंबईतील करी रोड परिसरात अविघ्न पार्क ही ६० मजली इमारत आहे. या इमारतीमध्ये १९ व्या मजल्यावर आज सकाळी ११.५० च्या सुमारास आग लागली. या आगीदरम्यान जीव वाचवण्याचा प्रयत्न करणारा एक व्यक्ती २१ व्या मजल्यावरून खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कडक कारवी केली जाईल अशी माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिली.

करी रोड येथील अविघ्न पार्क या 60 मजली इमारतीच्या 19 व्या माळ्यावर 11.50 च्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच पालिका आयुक्त चहल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दल, पोलीस आणि पालिकेचे अधिकारीही दाखल झाले. इमारतीमध्ये राहणाऱ्या सर्व रहिवाशांना बाहेर काढण्यात आले. मात्र आग 19 मजल्यावर लागून वरच्या मजल्यावर पसरली. 21 व्या मजल्यावर त्याचा धूर पसरताच एका व्यक्तीने 21 व्या मजल्यावरून उडी मारली. अग्निशमन दलाचे जवानपाेचण्यापूर्वी अरुण तिवारी या व्यक्तीचा मृत्यू झाला, अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे. या घटनेची चाैकशी करून दाेषी व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पालिका आयुक्त चहल यांनी दिली.

अशी हाेणार चाैकशी -
या इमारतीला आग लागल्यावर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाचे जवान येण्याआधीच एका व्यक्तीने 21 व्या मजल्यावरून उडी मारली. त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. या इमारतीचे फायर ऑडिट झाले होते का, फायर यंत्रणा काम करत होती का, इमारतीला ओसी मिळाली होती का याची चौकशी केली जाईल, अशी माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिली.

दोषींवर हाेणार कारवाई - महापाैर
अविघ्न पार्क इमारतीच्या इमारतीला महापौर किशोरी पेडणेकर यांनी भेट दिली. या दुर्घटनेप्रकरणी कोणालाही पाठीशी घालणार नाही. दोषी असतील त्यांच्यावर पालिका, अग्निशमन दल कारवाई करेल. तसेच पोलिसांकडूनही याची चौकशी करून गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

भेटीदरम्यान इमारतीमधील रहिवाशांनी या इमारतीत सुरू असलेल्या अनधिकृत कामांचा पाढा महापाैरांसमाेर वाचला. सोसायटी तयार हाेवून दोन वर्षे झाली तरी अद्याप पाणी नसल्याची तक्रार रहिवाशांनी महापाैरांकडे केल्या. यावर कालच मुख्यमंत्र्यांनी कोणालाही पाठीशी घालू नका, बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करा असे आदेश पालिकेला दिल्याचे महापाैरांनी स्पष्ट केले. त्यानुसार कोणालाही पाठीशी घालणार नाही. यात दोषी असतील त्यांच्यावर पालिका, अग्निशमन दल कारवाई करेल. तसेच पोलिसांकडूनही याची चौकशी करून गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती महापौर पेडणेकर यांनी दिली.



तर ताे वाचला असता -
एका व्यक्तीने 21 व्या मजल्यावरून उडी मारली. त्यात त्याचा मृत्यू झाला. या इमारतीमधील सुरक्षा रक्षकांना योग्य ट्रेनिंग दिली असती तर वरून पडणाऱ्या व्यक्तीचे जीव वाचवता आले असते, असे महापौर पेडणेकर म्हणाल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad