
या योजनेसंदर्भात केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाकडून सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून सूचना देण्यात आल्या आहेत. 15 ऑक्टोबर 2021 ते 31 मार्च 2026 पर्यंत या योजनेचा कालावधी असेल असे सांगण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत रस्त्यावरील अपघातग्रस्तांना प्रामाणिकपणे मदत करणा-या नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
रस्ते अपघातांमुळे होणा-या मृत्यूंचे प्रमाण कमी करणे हा सुद्धा या योजनेमागचा हेतू आहे. रोख बक्षिसासोबतच मदत करणा-या व्यक्तीला एक प्रमाणपत्र देखील दिले जाणार आहे. तसेच या पुरस्काराव्यतिरिक्त राष्ट्रीय स्तरावर सर्वात प्रामाणिकपणे मदत करणा-या 10 नागरिकांना एक-एक लाख रुपयांचा पुरस्कार देखील देण्यात येणार असल्याचे केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

ليست هناك تعليقات:
إرسال تعليق