मुंबईत दीड वर्षानंतर कोरोनामुळे एकही मृत्यू नाही - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 October 2021

मुंबईत दीड वर्षानंतर कोरोनामुळे एकही मृत्यू नाहीमुंबई - मुंबईत 26 मार्चनंतर 2020 नंतर गेल्या दीड वर्षानंतर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी मानले पालिका कर्मचाऱ्यांचे आणि माध्यमांचे आभार मानले. तसेच मुंबई सुरक्षित ठेवण्यासाठी मदत करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

मुंबईत गेल्या वर्षी 11 मार्चला पहिला रुग्ण आढळून आला. 17 मार्चला मुंबईत कोरोनामुळे मृत्यू झाला. मुंबईत गेल्या दीड वर्षात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला असताना रोज 80 ते 90 मृत्यूची नोंद होत होती. कोरोनाचा प्रसार आटोक्यात असल्याने सध्या 2 ते 6 मृत्यूची दररोज नोंद होत आहे. आतापर्यंत गेल्या दीड वर्षात 16 हजार 180 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षी 20 मार्च 2020 ला मुंबईत शून्य मृत्यूची नोंद झाली होती. त्यानंतर पालिकेने केलेल्या उपाययोजना आणि प्रयत्नांमुळे तब्बल दीड वर्षांनी आज शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

मुंबईत दीड वर्षांनी शून्य मृत्यूची नोंद झाल्याने ही मुंबईकरांसाठी चांगली बातमी आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या नेत्रदीपक कामगिरीसाठी मी सलाम करतो. महापालिकेला दिलेला पाठिंबा आणि प्रशासनावर ठेवलेल्या विश्वासासाठी टीम मिडियाचे मनापासून आभार मानतो. आपण सर्वांनी आपल्या चेहऱ्यावर मास्क लावावे. मुंबईतील प्रत्येक नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून मुंबई सुरक्षित ठेवण्यासाठी आम्हाला मदत करावी असे आवाहन पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी केले आहे.
No comments:

Post a Comment

Post Bottom Ad