मुंबई - दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या ओमीक्रोन वेरिएंटमुळं जगभरात भीतीचं वातावरण आहे. मात्र, दक्षिण आफ्रिकेत चिंतेचं वातावरण नसल्याच समोर आलं आहे. ओमिक्रॉनला डेल्टा वेरिएंट पेक्षा सातपट जास्त संक्रामक सांगितलं जातंय. मात्र, आफ्रिकेत नेमंक काय घडतंय. दक्षिण आफ्रिकेत परिस्थिती गंभीर नसल्याचं तिथल्या आरोग्य विषयक संस्थांनी सांगितलं आहे.
ओमिक्रॉन ज्या दक्षिण आफ्रिकेत आढळून आला आहे तिथं गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा दर कमी होत आहे. यामुळे आफ्रिकन मेडिकल असोसिएशननं ओमिक्रॉन विषाणू त्यांच्या देशात गेल्या दोन महिन्यांपासून असून त्यामध्ये 45 वेळा बदल झाल्याचं सांगितलं आहे. ओमिक्रॉन विषाणू आढळला असला तरी तिथं मृत्यूची संख्या झपाट्यानं कमी होत आहे. ओमिक्रॉननं संसर्गित होणाऱ्या रुग्णांमध्ये गंभीर लक्षणं आढळून आलेली नाहीत. त्यांची संसर्गाची लक्षण सौम्य असल्याचं दक्षिण आफ्रिकेतील तज्ज्ञांनी सांगितलंय.
आफ्रिकेतील 54 देशांमध्ये जगातील 17 टक्के लोकसंख्या आहे. तिथे 4200 रुग्ण दररोज समोर येत आहेत. तर यूरोपमध्ये दरदिवशी 3.63 लाख कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. आफ्रिकेत दररोज कोरोनामुळं 150 लोकांचा मृत्यू होतोय. तर, योरपमध्ये दररोज मरणाऱ्यांची संख्या 3880 इतकी आहे.गंभीर बाब म्हणजे यूरोपमध्ये कोरोनामुळं होणाऱ्या मृत्यूची संख्या दररोज वाढत आहे. यूरोपमध्ये आढळारे रुग्ण डेल्टा वेरिएंटचे आहेत.
ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी तातडीची बैठक बोलावली होती. आफ्रिकेतील धोका असणाऱ्या देशातून येणाऱ्या लोकांच्यावर विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरयांनी आफ्रिकेतून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची तपासणी केली जाईल. अहवाल पॉझिटिव्ह आल्यास जिनोम सिक्वेन्सिंग केलं जाईल. प्रवाशांना क्वारंटाईन केलं जाईळ. तर, कर्नाटाकात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला 7 दिवस होम क्वारंटाईन राहावं लागेल. त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास तो घराबाहेर पडू शकतो. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास विमानतळाजवळचं त्यांची क्वारंटाईनची व्यवस्था केली जाईल.
No comments:
Post a Comment