
मुंबईत मागील वर्षी कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर काही दिवसांतच झपाट्याने वाढत गेला. पहिल्या लाटेवर नियंत्रण आल्यानंतर फेब्रुवारी २०२१ च्या दरम्यान कोरोनाची दुसरी लाट आली. यावेळी ११ हजारावर रुग्ण संख्या नोंद झाली. रुग्णसंख्या वाढल्याने पालिकेने तिस-या लाटेचा सामना करण्यासाठी गोरेगाव पूर्व इथल्या नेस्कोतील ई हॉलमध्ये दीड हजार बेडचे जम्बो कोवीड सेंटर उभारले. यात १ हजार बेड ऑक्सिजनयुक्त आहेत. जुलै २०२१ मध्ये प्रत्यक्ष रुग्णसेवा सुरूवात झाली. यातील ७०० बेड हे ऑक्सीजन पाईप लाईनने जोडण्यात आलेत. यासाठी १३ के १ क्षमतेची नवीन टाकी काही दिवसांपूर्वी येथे बसवण्यात आली असून २५० रुग्णांना पुरेल इतका ऑक्सिजन निर्माण करणारे पाच प्रकल्प बसवून तयार करण्यात आलेत. सुमारे १० कोटी रुपये खर्च करून हे सेंटर उभारण्यात आले आहे. सध्या कोरोना नियंत्रणात असला तरी कोरोनाचे संकट अद्याप कायम आहे. शिवाय तज्ज्ञांकडून तिस-या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने कोविड केअर सेंटर बंद करू नका अशा सूचना राज्य टास्क फोर्सने दिले आहेत. गोरेगाव य़ेथे कोट्यवधी रुपये खर्च करून सुसज्ज असे जम्बो कोविड फेज -२ पालिकेने उभारले आहे. या सेंटरचा कोविड रुग्णांना फायदा झाला आहे. कोरोनाचे रुग्ण नियंत्रणात आले असले तरी तिस-या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. असे असतानाही फेज २- सेंटर पालिकेने बंद केले आहे. गुरुवारी पालिका आयुक्त चहल यांनी सेंटर बंद करण्याच्या फाईलवर सही केल्यानंतर दुस-या दिवशी शुक्रवारी या सेंटरचा ताबा नेस्को कंपनीने घेतला असल्याचे सांगण्यात आले.
कंपनीच्या दबावाखाली कोविड सेंटर बंद? -
मुंबई महापालिकेच्या प्रभावी उपाययोजनांमुळे कोरोनाच्या दुस-या लाटेवर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आले आहे. सक्रीय रुग्णांची संख्या कमी झाल्याने काही कोविड रुग्णालयेही नॉन कोविड रुग्णालये करण्यात आली आहेत. मात्र तिस-य़ा लाटेची शक्यता असल्याने कोविड सेंटर बंद करू नये अशा सूचना टास्कफोर्सच्या आहेत. मात्र संबंधित कंपन्यांच्या दबाबाखाली नेस्को कोविड सेंटर फेज २ बंद करण्याचा निर्णय पालिकने घेतला असल्याचे समजते. नेस्को लिमिटेड कंपनीकडे प्रचंड मोठा एफ हॉल तसेच आणखी दोन हॉल व्यवसायासाठी उपलब्ध आहेत. तरीही फेज २ चे कोवीड सेंटरचा हॉल कंपनीने ताब्यात घेतला आहे.
सेंटरमधील साहित्याचा इतर ठिकाणी वापर करणार -
गोरेगाव येथील जम्बो कोविड सेंटर फेज - २ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या सेंटरमधील साहित्याचा वापर इतर ठिकाणी केला जाणार आहे. आवश्यक असेल तिथे हे साहित्य उपलब्ध केले जाईल.
- सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त
No comments:
Post a Comment