कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय हा शेतकरी एकजुटीचा - अजित पवार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय हा शेतकरी एकजुटीचा - अजित पवार

Share This


मुंबई दि. १९ नोव्हेंबर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याचा घेतलेला निर्णय शेतकरी एकजुटीचा, महात्मा गांधीजींनी दाखवलेल्या अहिंसा, सत्याग्रहाच्या मार्गाचा विजय आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान योग्य निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान महोदयांचे आभार मानले आहेत. शांततामय मार्गाने दिलेल्या प्रदीर्घ लढ्याबद्दल शेतकरी बांधवांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.

शेतमालाला किमान आधारभूत दर देण्याचा कायदा केंद्रसरकारने करावा ही मागणीही लवकर मान्य व्हावी शिवाय लोकशाहीत लोकेच्छेचाच विजय होतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

ليست هناك تعليقات:

إرسال تعليق

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages