आयएनएस रणवीरवर स्फोट, ३ जणांचा मृत्यू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 January 2022

आयएनएस रणवीरवर स्फोट, ३ जणांचा मृत्यूमुंबई - मुंबईच्या नौदल डॉकयार्ड इथे असलेल्या आयएनएस रणवीरच्या एका कंपार्टमेंटमध्ये झालेल्या एका स्फोटात तीन नौदल कर्मचाऱ्यांच्या मृत्यू झाला आहे. हा स्फोट झाल्यावर,जहाजावरील कर्मचाऱ्यांनी त्वरित आणि तत्परतेने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हालचाली सुरु केल्या. या घटनेत मोठी वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. (Incident onboard INS Ranvir)

आयएनएस रणवीर ही युद्धनौका, नोव्हेंबर 2021 पासून, पूर्व नौदल कमांडमधून क्रॉस कोस्ट कार्यवाहीसाठी इथे तैनात होती आणि लवकरच ही नौका आपल्या तळावर परत जाणार होती. या घटनेच्या बोर्ड ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहे.

आयएनएस रणवीर हे पहिले विनाशक जहाज आहे. २१ एप्रिल १९८६ रोजी हे जहाज भारतीय नौदलात दाखल झाले. पूर्वीच्या सोव्हिएत युनियनमध्ये या जहाजाची बांधणी झाली होती. रणवीर वर्गाच्या जहाजांमध्ये पाणबुडी, कमी उडणारी विमाने आणि क्रूझ क्षेपणास्त्रांविरुद्ध वाहक टास्क फोर्स संरक्षणासाठी विमानविरोधी आणि पाणबुडीविरोधी युद्धासारख्या संरक्षणाचा समावेश होतो.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad