देशातील परिवर्तनाची सुरुवात महाराष्ट्रातून, के. सी. राव - ठाकरे - पवार भेट - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 February 2022

देशातील परिवर्तनाची सुरुवात महाराष्ट्रातून, के. सी. राव - ठाकरे - पवार भेटमुंबई - देशात परिवर्तनाची गरज असून या विरोधात समविचारी पक्षाची मोट बांधावी लागणार आहे. याची सुरुवात महाराष्ट्रातून झाली आहे. देश पातळीवर काही धोरणे बदलण्यासाठी आम्ही आज चर्चा केली. परिवर्तनासाठी शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा देशातील इतर पक्षांशी चर्चा करून यावर मार्ग काढला जाईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी यावर चर्चा झाली असून एकमत झाले आहे, अशी माहिती तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. राव यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट झाल्यानंतर के. सी. राव यांनी शरद पवार यांची सिल्वर ओकवर भेट घेऊन चर्चा केली. यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

यावेळी उद्धव ठाकरे यांनीही देशातील वातावरण गढूळ होत असल्याचे सांगत केंद्रीय तपास यंत्रणांच्या सूडाच्या राजकारणावर जोरदार टीका केली. सध्या देशात सुडाचे राजकारण सुरु आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग केला जातो आहे. त्यामुळे देशात परिवर्तनाची गरज आहे. याची सुरुवात महाराष्ट्रातून झाली आहे. ठाकरे, पवार भेटीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली असून एकमत झाले आहे. लवकरच इतर पक्षाच्या नेत्यांशीही चर्चा करून योग्य मार्ग काढला जाईल असेही के. सी. राव यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र - तेलंगणा एकत्र मिळून काम करणार आहोत. अनेक विषयांवर आमचे एकमत झाले आहे. येत्या काळात एकत्र काम करण्यासाठी समविचारी लोकांसोबत माझी चर्चा सुरू आहे. हैद्राबाद किंवा इतर ठिकाणी भेटून भाजपविरोधी आघाडी निर्माण करण्यासाठी मार्ग निश्चित करणार असल्याची माहिती तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. राव यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट झाल्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनीही देशातील वातावरण गढूळ होत असल्याचे सांगत केंद्रीय तपास यंत्रणांच्या सूडाच्या राजकारणावर जोरदार टीका केली.

देशात भाजपला सत्तेतून बाहेर खेचण्यासाठी समविचारी पक्ष एकत्र आणण्याच्यादृष्टीने समविचारी पक्षांचा प्रयत्न सुरु झाला आहे. यापूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. राव यांनी शिष्टमंडळासह रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षावर भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर राव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत भाजपविरोधात समविचारी पक्षांची मोट बांधण्यासाठी रणनिती ठरवण्यात आली.

देशातील राजकीय नेते भेटतात तेव्हा राजकारणावर चर्चा होते. देशपातळीवर काहीतरी बदल व्हायला हवा, या अनुषंगानेच ही भेट होती. देशाच्या ७५ वर्षांच्या स्वातंत्र्यानंतर ज्या गोष्टी घडायच्या होत्या त्या झाल्या नाहीत. म्हणूनच देशाच्या परिवर्तनासाठी युवा पिढीच्या माध्यमातून या गोष्टी घडाव्यात हा हेतू आहे. देशातील वातावरण खराब व्हायला नको. देशात परिवर्तनासाठी आमचे एकमत झाले आहे. महाराष्ट्रातून मोर्चा निघतो तो यशस्वी होतो असा आतापर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळे परिवर्तनाची सुरुवात महाराष्ट्रातून सुरुवात झाली आहे, असे राव म्हणाले. देशातील लोकशाही विरोधातील कामांना रोखण्यासाठी एक चांगली सुरूवात म्हणून आम्ही या भेटीकडे पाहत आहोत. उद्धवजींनी यापुढच्या काळात तेलंगणा येथे यावे असेही निमंत्रण त्यांनी यावेळी दिले. हे निमंत्रण तत्काळ उद्धव ठाकरेंनीही स्वीकारले. महाराष्ट्रातून प्रेम घेतले असल्याचेही ते म्हणाले.

देशात चांगले सुधार आणण्यासाठी तसेच अनेक गोष्टींमध्ये गती वाढवण्यासाठी काही स्ट्रक्चरल चेंजेस करण्यासाठी तसेच देश पातळीवर काही धोरणे बदलण्यासाठी आम्ही आज चर्चा केली. अनेक विषयांवर एकमत झाले, असल्याचे राव म्हणाले. परिवर्तनासाठी शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा ते देशातील अनुभवी नेते आहेत. समविचारी पक्षांचे संमेलन बारामतीत होऊ शकते असा प्रस्तावही राव यांनी मांडला.

देशातील वातावरण गढूळ – उद्धव ठाकरे
आजच्या भेटीतून आम्ही लपवण्यासाठी काहीही ठेवलेले नाही. आमची भेट ही देशात वातावरण दिवसागणिक गढूळ होते आहे त्यानिमित्ताने होती. सूडाचे राजकारण अतिशय खालच्या पातळीवर सुरू असल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. आमच हिंदुत्व बदला घेणार नाही. देशाला शेवटी भविष्य काय ? तसेच देशाच काय होईल ? हा विचार करायला पाहिजे होता, ती सुरूवात आम्ही करतो आहोत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. संपूर्ण देशात राज्य एकमेकांचा शेजारधर्म विसरली आहेत. अशावेळी राज्या राज्यात चांगल वातावरण रहायला हव अशा एक नव्या विचारांची सुरूवात आम्ही करत आहोत. राष्ट्रीय पातळीवर आघाडी निर्माण करण्याच्या विचाराला आकार उकाराला अवधी लागेल. पण ही प्रयत्नांची सुरूवात आहे. मेहनत करावी लागणार आहे. फक्त मूलभूत प्रश्नांना हात न लागता आरोप करायचे हा कारभार मोडायला हवा असेही ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या भेटीच्या निमित्ताने वर्षावर शिवसेनेतील बड्या नेत्यांची गर्दी दिसून आली. त्यामध्ये प्रामुख्याने खासदार संजय राऊत, उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार अरविंद सावंत, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती होती.

भाजपविरोधी आघाडीची मोट बारामतीत?
के. सी. राव - शरद पवार भेटीत प्रस्ताव
देशात स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षानंतरही काही गोष्टीत बदल झालेला नाही. त्यामुळेच देशात नवी अजेंडा घेऊन परिवर्तन घडवणार असल्याचे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. राव यांनी सांगितले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सील्वर ओक येथील निवासस्थानी झालेल्या भेटीनंतर ते प्रसारमाध्यांशी बोलत होते. शरद पवारांनी मला आशीर्वाद दिला आहे. तसेच एकत्र काम करण्याची गरज असल्याच्या मतावर सहमती झाली आहे. यापुढे देशातील अन्य लोकांसोबतही चर्चा करून दिशा ठरवणार असल्याचे राव म्हणाले.

देशात भाजपविरोधी आघाडी निर्माण करण्यासाठी बारामतीतून प्रस्ताव आहे. त्यामुळे समविचारी पक्षांचे संमेलन बारामतीत होऊ शकते असे संकेतही त्यांनी यावेळी दिले. सर्वांशी चर्चा करून एक बैठक होईल, जे खांद्याला खांदा मिळवून काम करण्यासाठी इच्छुक आहेत अशा सर्व लोकांशी बोलणी करून मार्ग करणार असल्याचेही राव म्हणाले. एक अजेंडा देशासमोर लवकरच मांडणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

राजकीय पक्ष एकत्र येत राजकीय चर्चा होत असते. पण आजची बैठक वेगळी होती. देशातील मुख्य समस्यांमध्ये गरीबी, भूकमारी, आत्महत्या, बेरोजगारी रस्ता काढण्यासाठीची आज बैठक झाली. या समस्यांवर काय करायला हवे यावरही चर्चा झाली. राजकीय चर्चा झाली नाही, पण विकासाचे प्रश्न महत्वाचे असल्याने या विषयावर चर्चा झाली. तेलंगणामध्ये शेतकऱ्यांच्या विकासासाठी देशपातळीवर सर्वाधिक वेगळ्या पद्धतीची पावले उचलण्यात आली आहेत. एक मार्ग देशाला तेलंगणा राज्याने दाखवला असल्याचेही शरद पवार यांनी यावेळी सांगितले. विकास आणि विकास याच विषयावर आज चर्चा झाली. बेरोजगारी आणि गरीबी सुटका करण्यासाठी पूर्ण देशात माहोल तयार करणे गरजेचे असल्याचे आणि त्यासाठीचे प्रयत्न गरजेचे असल्याचेही पवार म्हणाले. देशात तिसऱ्या आघाडीबाबतचा यापुढचा कार्यक्रम कधी ? कुठे ? हे निश्चित करणार असल्याचेही ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages