फडणवीसांच्या काळात २५ हजार कोटींचा घोटाळा, भ्रष्टाचार बाहेर काढणारे सोमय्या गोत्यात - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 February 2022

फडणवीसांच्या काळात २५ हजार कोटींचा घोटाळा, भ्रष्टाचार बाहेर काढणारे सोमय्या गोत्यात



मुंबई - राज्यात भाजपचे सरकार असताना सरकारने महाआयटीमध्ये २५ हजार कोटींचा घोटाळा झाला असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. हा गंभीर आरोप करताना राऊत यांनी अमोल काळे आणि विजय ढवंगाळे यांची नावे घेतली आहेत. यांच्या बँक खात्यातून पैसे कुठे कुठे गेले, विना टेंडर कोणाला कंत्राट दिले गेले, हा पैसा कुठे कुठे गेले याची तक्रार आपण करणार असल्याची घोषणा राऊत यांनी केली. ५ हजार कोटींचा हिशोब माझ्याकडे आलेला आहे. याबाबतची सगळी माहिती मी संबंधित तपास यंत्रणांकडे देणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

संजय राऊत यांनी शिवसेना भवन येथे शशक्ती प्रदर्शन करत पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना, मागील फडणवीस सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करताना खासदार संजय राऊत यांनी हरयाणातील एन नरवर या दूधवाल्याचा उल्लेख केला. राऊत म्हणाले की एन नरवर हा हरयाणातील एक दूधवाला आहे. मी ईडीला विचारतो की, या नरवरला ओळखता का? हा दूधवाला आहे. या दूधवाल्याकडे ७ हजार कोटींची संपत्ती आहे. हा दूधवाला ७ हजार कोटींचा मालक कसा बनला. त्याच्याकडे कोणाचा पैसा आहे. दूधवाला नरवर याचे नाव घेऊन खासदार राऊत यांनी फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केले. राज्यात भाजपचे सरकार होते तेव्हा हा दूधवाला नरवर महाराष्ट्रात ये-जा करत होता. त्यानंतरच त्याची ही मालमत्ता तयार झाली, असा गंभीर आरोप करताना हे मनी लाँड्रिंग कोणी केले याबाबत मी तक्रार करणार असल्याचे खासदार राऊत म्हणाले.

सरकार पाडण्यासाठी प्लान -
महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जायला तयार आहे. महाविकासआघाडी सरकारकडे १७० आमदार आहेत. त्यामुळे तुम्ही लोकशाहीचे संकेत पायदळी कसे तुडवू शकता, असा सवाल मी भाजप नेत्यांना विचारला. महाराष्ट्रातील सरकार पाडायचा प्रयत्न केलात तर ठिणगी पडेल, असे मी त्यांना सांगितले. पण भाजपचे नेते म्हणाले की, असे काहीही होणार नाही. आम्ही महाराष्ट्रात केंद्रीय पोलीस दल आणून सर्व थंड करू, असे त्यांनी म्हटले. त्यानंतरही मी सरकार पाडण्याच्या कटात सहभागी होण्यास नकार दिला. यानंतर तिसऱ्याच दिवशी माझे मित्र आणि निकटवर्तीयांवर धाडी पडायला सुरुवात झाली. पण बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला कधी गुडघे टेकायला शिकवले नाही. त्यामुळे तुम्ही काहीही करा हे सरकार पडणार नाही, असे मी भाजपच्या नेत्यांना सांगितले. त्यानंतर सातत्याने माझ्या कुटुंबीयांना आणि निकटवर्तीयांना लक्ष्य केले जात आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या कुटुंबीयांवर धाडी पडल्या होत्या. हे प्रकरण सुद्धा दिसतंय तितकं सोपं नाही. त्यांनासुद्धा केंद्रीय यंत्रणांकडून टाईट केले जात आहे. त्यामुळेच पवार साहेबांच्या कुटुंबावर, त्यांच्या मुलींच्या घरी धाडी पडत आहेत. ईडीचे अधिकारी त्याठिकाणी आठ दिवस ठाण मांडून बसले आहेत. त्यांनाही ईडीच्या अधिकाऱ्यांकडून धमक्या देण्यात आल्या, असा दावा संजय राऊत यांनी केला.

'मोहीत कंबोज फडणवीसांना बुडवणार' -
फडणवीस सरकारच्या काळात इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा झाल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. तसंच मोहीत कंबोज हा फडणवीसांचा लाडका व्यक्तीच त्यांना बुडवणार आहे, असं ते म्हणाले.

सुधीर मुनगंटीवार यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा -
ईडीसह इतर केंद्रीय तपास यंत्रणांकडून जाणीवपूर्वक आम्हाला त्रास दिला जात आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला. 'माझ्या मुलीचं लग्न झाल्यानंतर ईडीवाले चौकशी करण्यासाठी मेहेंदीवाल्यांकडे गेले, मी जेथून कपडे शिवले त्या व्यक्तीकडे गेले. फडणवीस सरकारच्या काळात तत्कालीन वनमंत्र्याने आपल्या मुलीचं लग्न मुंबईत केलं होतं. वनमंत्री असल्याने जंगलाचा सेट या लग्नासाठी उभारण्यात आला होता. जंगलाचा फील येण्यासाठी या लग्नात जे कार्पेट टाकण्यात आले होते त्याची किंमत साडेनऊ कोटी रुपये होती,' असा दावा करत संजय राऊत यांनी भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

पीएमसी बँक घोटाळ्याचा पैसा सोमय्यांच्या मुलाच्या कंपनीत -
"निकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी कुणाची आहे? ही कंपनी किरीट सोमय्या यांची आहे. त्यांच्या कुटुंबियांशी आहे. त्यांचा मुलगा नील किरीट सोमय्या यांची आहे, जो राकेश वाधवान यांचा पार्टनर आहे. हजारो कोटी रुपयांचा प्रकल्प त्यांनी मौजे गोखीवरे ता. वसई येथे उभारला आहे. हे मी पुराव्यानिशी सांगतोय."

"पीएमसी बँक घोटाळ्याचा मास्टरमाईंड वाधवानशी यांचा थेट आर्थिक संबंध आहे. पीएमसी बँक घोटाळ्यात सोमय्यांनी ब्लॅकमेल केलं. वाधवानकडून कोट्यवधी रुपयांची जमिन फ्रंटमॅन आहे लाढानी म्हणून त्याच्या नावावर घेतली तसंच कॅशही घेतली. ती ८० ते १०० कोटी रुपयांच्या घरात आहे. गोखीवरे वसई येथे ४०० कोटी रुपयांची जमीन फक्त साडे चार कोटी रुपयांना घेतली. आणखी एक जमीन घेतली आहे, ती सात कोटी रुपयांची आहे आणि त्याच जमीनीवर कंपनीचा डायरेक्टर नील किरीट सोमय्या निकॉन फेज १, निकॉन फेज २ उभारले जातायत." "या प्रकल्पात Enviroment Cleareance नाही. अनेक नियमांची पायमल्ली केली गेली आहे. राष्ट्रीय हरित लवादाने जर दखल घेतली तर २०० कोटी रुपयांचा दंड होईल. माझं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना आवाहन आहे, की ताबडतोब यात लक्ष घाला. या प्रोजेक्टचे सर्व परवाने रद्द करा..." "पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी OW ने किरीट सोमय्या आणि नील सोमय्याला अटक करावी. पीएमसी बँक घोटाळ्याआधी किरीट सोमय्याच्या जवळच्या लोकांनी बँकेतील सगळे पैसे काढून घेतले आहेत. म्हणजे त्यांना घोटाळा होणार आहे, हे माहिती होतं. ही सगळी यादी मी तुम्हाला देणार आहे. मुळात पीएमसी बँक घोटाळ्यातील माणसाने किरीट सोमय्या यांना जमीन कशी विकली?", असा सवाल राऊतांनी विचारले.

"दुसरी गंमत तुम्हाला सांगतो, पीएमसीचा तपास ईडी करतेय. हे सगळे कागद ईडीकडे पाठवले आहेत. सोमय्यांच्या भ्रष्टाचाराचे कागद किमान तीन वेळा ईडीला पाठवले.. तुम्ही एक दोन गुंठ्यांच्या लोकांना बोलावता.. सोमय्या ईडीच्या ऑफिसात दही खिचडी खात असतो.. ईडी भ्रष्ट आहे, हे सगळे ईडीचे वसुली एजंट झालेत, हा माझा दावाय", असंही राऊत म्हणाले.

आजची पत्रकार परिषद ही मी ईडीच्या कार्यालयाबाहेरच घेणार होतो. महाराष्ट्रात आता तुम्ही की आम्ही, कोण राहतंय ते पाहू. बाहेरचे लोक येऊन आमच्यावर दादागिरी करणार. आमच्या बायका-मुलींकडे बघणार. यावर भाजपवाले टाळ्या वाजवणार. हे अत्यंत खालच्या दर्जाचे राजकारण असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad