प्रभाग फेररचना - 812 एकूण हरकती आणि सुचना दाखल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 February 2022

प्रभाग फेररचना - 812 एकूण हरकती आणि सुचना दाखलमुंबई - एप्रिल महिण्याच्या मध्यापर्यंत हाेणार्या महानगर पालिका निवडणुकीसाठी प्रभाग फेररचनासाठी सुचना आणि हरकती मागविण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी एकूण 812 सुचना हरकती आणि सुचना प्राप्त झाल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. प्राप्त झालेल्या सुचना हरकतीमध्ये लाेकप्रतिनिधींच्या तक्रारी मिळाल्या आहेत. अंधेरी पूर्व, कांदिवली, गाेवंडी, घाटकाेपर, कुर्ला या भागातून सर्वाधिक सुचना आणि हरकतींचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून आले. कुलाबा येथून एकही हरकत सुचना आलेली नाही. प्रभागांचे विभाजन नकाे असा अशा हरकती माेठया प्रमाणात आल्या आहेत.

गेल्या 1 फेब्रूवारी 14 फेब्रूवारी या कालावधीत सुचना आणि हरकती मागविण्यात आल्या हाेत्या. आज शेवटच्या दिवशी सुचना आणि हरकती मागविण्याच्या शेवटच्या दिवशी 451 सुचना हरकती मिळाल्याने आतापर्यंत प्राप्त झालेल्या सुचना हरकतींची एकूण संख्या 812 इतकी झाली आहे. गेल्या २०१७ मध्ये ६१३ हरकती सूचना प्राप्त झाल्या हाेत्या. त्या तुलनेत यावेळी आलेल्या हरकती आणि सुचनांची संख्या वाढली आहे. झोपडपट्टीचे विभाजन नको, सीमा बदलू नका, नागरिकांची गैरसोय, प्रभागांचे विभाजन नको अशा स्वरूपाच्या सुचना आणि हरकती माेठ्या प्रमाणात आल्या आहेत. यात बहुतांश राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि लाेकप्रतिनिधींच्या आणि स्थानिक नागरिकांच्या असल्याचे दिसून आले आहे.

येत्या 14 ते 21 फेब्रूवारी पर्यंत आलेल्या सुचना आणि हरकतींचे वर्गीकरण आणि छाननी करण्यात येणार, त्या राज्य निवडणूक आयाेगाने स्थापन केलेल्या समितीला सुपूर्द केल्या जातील. असून 22 ते 26 फेब्रूवारी दरम्यान सुनावणी हाेणार आहे. पालिकेने 2 ते 3 प्रभाग सुनावणीसाठी निवडले आहेत. त्यातील एका जागेची समितीसमाेर सुनावणी हाेणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त काकाणी यांनी दिली. सुनावणीवेळी समितीला काही मदत लागल्यास पालिकेचे अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. २ मार्च राेजी निवडणूक आयोगाला याबाबतचा अहवाल सादर करण्यात येईल, असे ही काकाणी यांनी सांगितले. मुंबईतील प्रभाग २२७ वरुन २३६ करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर राज्यपालांनी अध्यादेश जारी केले. त्यानंतर मुंबई महापालिकेने नवीन प्रभाग रचनेचा आराखडा राज्य सरकारकडे सादर केला असून त्यावर हरकती सूचना मागवण्यात येत आल्या हाेत्या.

प्रभाग रचनेचे निकष
प्रभाग रचना करताना भाैगाेलिक सलगता, लाेकसंख्या नागरिकांची गैरसाेय हाेवू नये आणि सेवा सुविधा काेणताही ताण पडू नये या निकषावर करण्यात येणार आहे.

सर्वाधिक हरकती सूचना!
अंधेरी पूर्व - ८५
देवनार गोवंडी - ८४
घाटकोपर - ७९
कांदिवली - ७६

शहर व उपनगरातून प्राप्त हरकती सूचना
शहर - ७६
पश्चिम उपनगर - ३३९
पूर्व उपनगरात - २६३

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad