प्राण्यांच्या हक्कासाठी देशभरातील व्हीगन कार्यकर्त्यांची पदयात्रा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 May 2022

प्राण्यांच्या हक्कासाठी देशभरातील व्हीगन कार्यकर्त्यांची पदयात्रा

 

मुंबईः- "द अॅनिमल लिबरेशन मार्च इंडिया" या प्राणी हक्कांसाठी आयोजित केलेल्या सर्वात मोठ्या पदयात्रेत सहभागी होण्यासाठी देशभरातील प्राणी हक्क कार्यकर्ते मुंबई कार्टर रोड येथे शेकडोंच्या संख्येने जमले होते. त्यांनी "बॅट ऑफ ऑनर" ते "जॉगर्स पार्क" पर्यंत पदयात्रा केली. व्हीगनीजम बद्दल जागृती निर्माण करणे आणि प्राण्यांना न्याय मिळावा असा या मोर्चाचा उद्देश होता. अन्न, वस्त्र, प्रयोग, मनोरंजन किंवा इतर कोणत्याही हेतूसाठी सर्व प्राण्यांना वापर, शोषण, अत्याचार आणि क्रूरतेपासून मुक्त जगण्याचा मूलभूत अधिकार आहे, या उद्देशाचा कार्यकर्त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला.

व्हेेगन इंडिया मुव्हमेंटतर्फे मुंबई येथे आज आयोजित अॅनिमेशन लिबरेशन मार्चचे. बॅट ऑफ ऑर्नस पासून सुरू झालेली ही पदयात्रा जॉगर्स पार्क पर्यंत जाऊन तेथून पुन्हा याच मार्गाने येऊन बॅट ऑफ ऑनर्स येथे या पदयात्रेचा समारोप झाला.

या संपूर्ण कार्यक्रमात सहभागी कार्यकर्त्यांनी प्राणी हक्क आणि त्यांच्यावर होणारा अन्याय, क्रूरता आणि त्यांच्या स्वातंत्र्यासाठी घोषणाबाजी केली. पुणे, दिल्ली, हैदराबाद, गोवा यांसारख्या विविध शहरांमधून ४०० हून अधिक कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. ही भारतातील प्राणी मुक्ती चळवळीतील एक महत्त्वाची घटना ठरली. या कार्यक्रमात गायिका अनुष्का मनचंदा, अभिनेत्री किटू गिडवानी यांसारख्या सेलिब्रिटींनीही सहभाग घेतला. कार्यकर्त्यांनी "Ditch Dairy" "Ditch Eggs" सारखे संदेश असलेले फलक हातात घेण्यात आले होते, ज्याव्दारे प्राणी उत्पादने सोडण्याचे आवाहन नागरिकांना यावेळी करण्यात आले.

यावेळी बोलताना श्वेता सावला म्हणाल्या की, एखादा प्राणी वेगळ्या प्रजातीचा असल्यामुळे त्यांच्याशी भेदभाव करणे आणि त्यांचे शोषण करणे योग्य ठरत नाही. जसे आपण आपले लिंग, वंश किंवा लैंगिक अभिमुखता निवडू शकत नाही त्याप्रमाणेच प्राणी देखील त्यांच्या प्रजातीची निवड करू शकत नाही. कोंबडी, गाय, बकरी, डुक्कर, मासे, मांजर, कुत्रे किंवा माणसे असोत, आपण सर्व संवेदनशील प्राणी आहोत आणि आपण शांतपणे एकत्र राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. व्हीगन लोक वनस्पती आधारित आहाराचे पालन करतात, म्हणजेच मांस, अंडी मध आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन टाळतात. कारण यासाठी प्राण्यांचा वापर आणि त्यांचे शोषण केले जाते.

यावेळी बोलताना कार्यक्रमाचे मुख्य संयोजक अमजोर चंद्रन म्हणाले की, आजकाल सगळ्यांना व्हीगन बनणे शक्य आहे. माणसाच्या विविध दैनंदिन गरजा भागविण्यासाठी केला जाणारा प्राण्यांचा वापर आणि त्यातून होणारे त्यांचे शोषण खरोखरच वेदनादायी आहे. मुक्या प्राण्यांवर होणारा हा अत्याचार विवेकी म्हटल्या जाणा-या माणसांनी वेळीच थांबवला पाहिजे. अशा प्रकारच्या पदयात्रा, मोर्चे आणि सभांच्या माध्यमातून संपूर्ण देशात व्हीगन चळवळीला प्रोत्साहन देणे आणि अधिक वेगाने तिचा प्रचार-प्रसार करणे, हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

या कार्यक्रमाने "प्रजातिवादाला" संबोधित केले. प्रजातीवाद हा भेदभावाचा एक प्रकार आहे, ज्यामध्ये एका प्रजातीच्या सदस्यांना इतर प्रजातींच्या सदस्यांपेक्षा नैतिकदृष्ट्या अधिक महत्त्वाचे मानले जाते. यावेळी कार्यकर्त्यांनी लोकांना प्रजातीवादाबद्दल विचार करण्यास आणि व्हीगन जीवनशैलीचा अवलंब करून प्राण्यांच्या शोषणापासून माघार घेण्यास प्रोत्साहित केले.

कोणत्याही प्राण्यांच्या उत्पादनांचे सेवन न करणे, प्राण्यांवर चाचणी केलेल्या सौंदर्यप्रसाधने आणि इतर उत्पादनांचा वापर न करणे, प्राण्यांचे चांबडे आणि फरपासून मुक्त फॅशन निवडणे आणि प्राण्यांच्या सर्कसला भेट न देणे, सी वर्ल्ड आणि प्राणीसंग्रहालय, पाळीव प्राणी खरेदी करण्यापेक्षा पाळीव प्राणी दत्तक घेणे या मूल्यांना महत्त्व देऊन प्राण्यांच्या सर्व प्रकारच्या शोषणाचा विरोध यावेळी करण्यात आला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad