कांदिवली, बोरिवली, दहिसर, मालाड मध्ये ३१ मे ते १ जून पाणीकपात - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कांदिवली, बोरिवली, दहिसर, मालाड मध्ये ३१ मे ते १ जून पाणीकपात

Share This

मुंबई - मुंबई महानगरपालिकेतर्फे आर/दक्षिण विभागात कांदिवली (पूर्व) येथील लोखंडवाला वसाहतीत १८०० मिलीमीटर जलवाहिनीसोबत १५०० मिलीमीटर जलवाहिनी जोडण्याचे काम व ठाकूर व्हिलेज येथे १८०० मिलीमीटर जलवाहिनी स्थलांतरीत करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम मंगळवार दिनांक ३१ मे २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजता सुरु होऊन ते बुधवार दिनांक १ जून २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. सदर कालावधीत महानगरपालिकेच्या आर/दक्षिण विभागातील कांदिवली (पूर्व), आर/मध्य विभागातील बोरिवली (पूर्व), आर/उत्तर विभागातील दहिसर (पूर्व) आणि पी/उत्तर विभागातील मालाड (पूर्व) परिसरांमध्ये काही ठिकाणी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

जलवाहिनीचे काम हाती घेण्यात आल्याने या परिसरातील पाणी कपात केली जाणार आहे. रहिवाशांनी पाणीकपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे.

ليست هناك تعليقات:

إرسال تعليق

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages