Bmc Elelection - आरक्षण सोडतीत "या" दिग्गजांना फटका - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 May 2022

Bmc Elelection - आरक्षण सोडतीत "या" दिग्गजांना फटका


मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या आरक्षण सोडतीत अनेक दिग्गजांच्या प्रभागात आरक्षण पडल्याने त्यांना फटका बसला आहे. यात माजी विरोधी पक्षनेते रवी राजा, माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, किशोरी पेडणेकर, भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे, विनोद मिश्रा, आशिष चेंबूरकर, मंगेश सातमकर, अमेय घोले आदींच्या प्रभागात आरक्षण पडल्याने त्यांना दुस-या वॉर्डमधून संधी शोधावी लागणार आहे. दरम्यान आरक्षण सोडतीनंतर राजकीय हालचालींना वेग आला असून रणनिती मांडण्यास आता सुरुवात झाली आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत ही इच्छुक उमेदवारांचे भवितव्य ठरवत असते. अनेक नगरसेवक आपल्या वॉर्डच्या आरक्षणाचे काय होणार याची उत्सुकता असल्याने सकाळपासूनच वांद्र्याच्या रंगशारदा सभागृहात कार्यकर्त्यांसह दाखल झाले होते. त्यामुळे उत्साहासोबत धाकधूकही होती. जस जसे आरक्षण जाहीर होत होते तस तसे काही जणांकडून सुटकेचा नि:श्वास सोडला जात होता तर काही जणांकडून नाराजी व्यक्त होत होती. अनेक इच्छुकांच्या प्रभागात आरक्षण पडल्याने त्यांना आता दुसरा पर्याय शोधावा लागणार आहे. स्थायी समिती यशवंत जाधव यांचा माझगाव हा व़ॉर्ड सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षित झाला आहे. माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वऱ यांचा सांताक्रुझ (पूर्व) वॉर्ड सर्वसाधारण महिला गटात आरक्षित झाला. तसेच माजी बेस्ट समितीचे अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांचा वरळी हा वॉर्ड अनुसूचित जातीसाठी राखीव झाला आहे. माजी विरोधीपक्षनेते रवी राजा, भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे, विनोद मिश्रा, तर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा वॉर्ड २०६ सर्वसाधारण गटासाठी राखीव झाला आहे. तर मनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांचा वॉर्ड महिलांसाठी राखीव झाला आहे. शिवसेनेचे अमेय घोले यांचा वॉर्डही आरक्षित झाला आहे. शिवसेनेचे पालिकेतील पहिल्या फळीतील असलेले मंगेश सातमकर यांच्या प्रभागातही आरक्षित झाला आहे. सोडतीत, काँग्रेस, शिवसेना, भाजपमधील अनेक दिग्गजांना फटका बसल्याने त्यांना बाजूच्या वॉर्डात उभे राहण्यासाठी पर्याय निवडावा लागणार आहे. मात्र वॉर्ड पुनर्रचनेत अनेक वॉर्ड कापले गेल्याने हे वॉर्ड कोणासाठी किती सुरक्षित असतील हा प्रश्न असणार असणार आहे. त्यामुळे महिला आरक्षण झाले असल्यास काही जण पत्नी, मुलींना किंवा सुनांना उभे करण्याची शक्यता आहे. दरम्यान काही प्रभागात नवीन उमेदवारांना संधी मिळण्याची शक्यता आहे. प्रभाग आरक्षण जाहिर झाल्याने अशा इच्छुकांनी चाचपणी करण्यास सुरुवात केली असल्याचे समजते.

आरक्षण पडल्याने यांना फटका -
भाजप -
प्रभाकर शिंदे, अभिजित सामंत, विनोद मिश्रा, जगदीश ओझा, आकाश पुरोहित, नील सोमय्या, हरीश भार्डिंगे,  दीपक ठाकूर, हर्ष पटेल, संदीप पटेल, मकरंद नार्वेकर, अतुल शाह, पंकज यादव, शिवकुमार झा, बाळा तावडे

काँग्रेस -
रवी राजा, अश्रफ आझमी, आसिफ झकेरिया, वीरेंद्र चौधरी, सुफियान वणू,

शिवसेना -
यशवंत जाधव, राजूल पटेल, विठ्ठल लोकरे, संजय घाडी, चंद्रशेखर वायंगणकर, विश्वनाथ महाडेश्वर, राजू पेडणेकर, मंगेश सातमकर, उपेंद्र सावंत, उमेश माने, परमेश्वर कदम, अमेय घोले, आशिष चेंबूरकर, सदानंद परब, स्वप्नील टेंम्बवलकर

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad