
गेल्या सोमवारी १५० रुग्णांची नोंद झाली होती. त्याच्या आधी ही रुग्णसंख्या स्थिर राहिली होती. मात्र मंगळवारी ही संख्या २१८ वर गेली. त्यानंतर आता ही आकडेवारी पावणे चारशेवर पोहचवली आहे. कोरोना रुग्णसंख्येत होणारी वाढ व नव्या व्हेरियंटचे पुण्यात आढळले रुग्ण यामुळे चिंता वाढते आहे. दिवसभरात ३७५ रुग्ण आढळले. तर २३४ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. मुंबईत आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या एक लाख ६४ हजार ९७८ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात शून्य मृत्यूची नोंद झाल्याने मृतांची संख्या १९ हजार ५६६ वर स्थिर आहे. तर दिवसभरात २३४ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत १ लाख ४३ हजार ३४२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर ९८ टक्के आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी २८७२ दिवसांवर गेला आहे. मुंबईत सध्या २,०७० सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागातून देण्यात आली.

ليست هناك تعليقات:
إرسال تعليق