Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

अजय चौधरी शिवसेनेचे नवे गटनेतेमुंबई - शिवसेनेविरोधात बंड करुन सुरतमध्ये गेलेल्या एकनाथ शिंदे यांच्यावर सेनेने कारवाई करत त्यांना गटनेते पदावरुन हटवले आहे. त्या ठिकाणी आता शिवडी मतदारसंघाच्या अजय चौधरी यांची वर्णी लागली आहे. शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्यावर तडकाफडकी कारवाई करत हा निर्णय घेतला आहे.

अजय चौधरी हे शिवसेनेचे शिवडी विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. 2019 मध्ये विधानसभा मतदारसंघातून अजय चौधरी 40 हजार मताधिक्क्याने विजयी झाले होते. त्यांनी मनसेचे उमेदवार संतोष नलावडे यांचा दारुण पराभव केला होता. चौधरी हे परळ येथे वास्तव्यास आहेत. अजय चौधरी हे कट्टर शिवसैनिक आहेत. त्यांच्या माध्यमातून पक्षावर ठाकरे कुटुंबाचीच मांड कायम राहावी यासाठी उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom