देशात १३ हजार २१६ नवीन कोरोनाबाधित - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 June 2022

देशात १३ हजार २१६ नवीन कोरोनाबाधितनवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर संपला असे वाटत असताना आता कोरोनाच्या संभाव्य चौथ्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. देशात १३ हजार २१६ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

देशात सर्वाधिक नवीन रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. त्यानंतर राजधानी दिल्लीतील रुग्णसंख्येचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात शक्रवारी दिवसभरात ४,१६५ नवीन रुग्णांची नोद झाली आहे. तर दिल्लीमध्ये १,७९७ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या वाढून ६८ हजारांवर पोहोचली आहे. सध्या भारतात ६८ हजार १०८ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. गेल्या २४ तासांत ८ हजार १४८ रुग्णांनी कोरोना विषाणूच्या संसर्गावर मात केली आहे. देशातील सक्रिय रुग्णांचा सरासरी दर ०.१६ टक्के आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.६३ टक्क्यांवर पोहोचले आहे. देशात कोरोना महामारी सुरू झाल्यास आतापर्यंत एकूण ४ कोटी २६ लाख ९० हजार ८४५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही नवीन आकडेवारी जारी केली आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad