
मुंबई - मुंबईत कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढते आहे. रविवारी दिवसभरात १८०३ रुग्ण आढळले. तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला. शनिवारी रुग्णसंख्या १७४५ नोंद झाली होती. दिवसभरात ८८८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. २४ तासांत एकूण १५९२२ चाचण्या करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागातून देण्यात आली.
मुंबईत मागील काही दिवसांपासून रुग्णांची संख्या वाढते आहे. रोजची रुग्णसंख्या दोन हजाराच्या जवळपास गेली आहे. बरे होणा-या रुग्णांची संख्या समाधानकारक आहे. दिवसभरात ९५९ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या एक लाख ८० हजार ७४७ झाली आहे. तर दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतची मृतांची संख्या १९ हजार ५७३ झाली आहे. तर आतापर्यंत १ लाख ५० हजार २८५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्के वर आला आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी ५१३ दिवसांवर घसरला आहे. मुंबईत सध्या १० हजार ८८९ सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

ليست هناك تعليقات:
إرسال تعليق