
मुंबई - रिपब्लिकन पक्ष खरात गट मुंबई महापालिकेची निवडणूक लढवणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादीकडे १५ जागा मागण्यात आल्या आहेत अशी माहिती अध्यक्ष सचिन खरात यांनी दिली. मुंबई मराठी पत्रकार संघात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देहू येथील कार्यक्रमात बोलू दिले नाही याचा निषेध व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाच राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.

ليست هناك تعليقات:
إرسال تعليق