बेस्टच्या कंत्राटी चालकांचे तिस-या दिवशीही कामबंद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 July 2022

बेस्टच्या कंत्राटी चालकांचे तिस-या दिवशीही कामबंद


मुंबई - बेस्टमधील कंत्राटी चालकांनी वेतन वेळेत मिळत नसल्याने रविवारपासून सुरु केलेले कामबंद आंदोलन मंगळवारी तिस-या दिवशीही सुरु ठेवले आहे. त्यामुळे वडाळा आगारातून कंत्राटी बसेस बंद ठेवण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झाले. थकीत वेतन व भविष्य निर्वाहनिधीची रक्कम मिळेपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय कंत्राटी चालकांनी घेतला आहे.

बेस्टमधील कंत्राटी चालकांनी पगार वेळेत मिळत नसल्याच्या निषेधार्थ रविवारपासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे. सोमवारी वडाळा आगारातून एम्.पी. ग्रुपच्या ६३ कंत्राटी चालकांनी सेवा न पुरविल्याने प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागले. त्यावेळी, बेस्टने प्रवाशांच्या सुविधेसाठी २७ बस चालविल्या. रविवारी वडाळा आगारातून ४८ बस आंदोलनात सहभागी झालेल्या चालकांमुळे सुटल्या नाहीत. तेव्हा, बेस्टने २९ बस चालविल्या. मात्र तिस-या दिवसानंतरही कंत्राटी बसचालकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. यापूर्वीही वेतन थकवल्याने एमपी ग्रुपच्या कंत्राटी बसगाड्यांच्या चालकांनी कामबंद आंदोलन केले होते. त्यावेळी चालकांची थकीत वेतनाची रक्कम अदा करण्यात आली. यापुढे वेतन रखडवले जाणार नाही असे आश्वासन दिल्यानंतर चालकांनी पाच ते सहा दिवसांनी आंदोलन मागे घेतले होते. मात्र आता पुन्हा वेतन थकवल्य़ाने चालकांनी पुन्हा कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. वडाळा आगारातील कंत्राटी चालकांनी कामबंद केले आहे. मंगळवारी तिस-या दिवशीही कामगारांच्या आंदोलनाची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे चालकांमध्ये संताप व्यक्त केला जातो आहे. वेतन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा पवित्रा चालकांनी घेतला आहे. दरम्यान आंदोलनामुळे वडाळा आगारातील एकही कंत्राटी बस चालवण्यात न आल्याने प्रवाशांना गैरसोयींना सामोरे जावे लागले. बेस्टने प्रवाशांच्या सोयीसाठी काही बसेस चालवल्या. अपु-या बसेसमुळे प्रवाशांना खासगी वाहन व टॅक्सीला जास्त पैसे मोजून कामावर पोहचावे लागले.

संपामुळे प्रवाशांचे हाल -
रविवारपासून बेस्टच्य़ा कंत्राटी चालकांनी कामबंद आंदोलन सुरु केल्याने मंगळवारी तिस-या दिवशीही ६३ कंत्राटी बसेस चालवण्यात आल्या नाहीत. त्यामुळे अनेक मार्गावर बेस्टने प्रवास करणा-या प्रवाशांचे हाल झाले. थकीत वेतन आणि भविष्य निर्वाहनिधीचा प्रश्न सुटल्याशिवाय़ आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार कंत्राटी कामगारांनी घेतल्याने प्रवाशांचे हाल होणार आहेत.

बेस्टच्या ताफ्यातील बसेस -
बेस्टच्या मालकीच्या बसेस - १८५४
कंत्राटी बसेस - १७९३
एकूण बसेस - ३६२७

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad