मुख्य अग्निशमन अधिकारी पदी हेमंत परब - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुख्य अग्निशमन अधिकारी पदी हेमंत परब

Share This


मुंबई - मुंबई अग्निशमन दलाच्या मुख्य अग्निशमन अधिकारी पदी हेमंत परब यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेले अनेक महिने त्यांच्याकडे या पदाचा हंगामी पदभार होता. मुंबई अग्निशमन दलातील अतिशय अनुभवी अशा अधिकाऱ्याची या सर्वोच्च पदावर जबाबदारी देण्यात आली आहे.

हेमंत परब यांना गतवर्षी राष्ट्रपती सेवा वीरता पदकाने सन्मानित करण्यात आले होते. मुंबईत दुर्घटनाग्रस्त झालेल्या भानुशाली इमारतीत बचाव आणि शोध कार्यात दाखवलेल्या साहसासाठी तसेच कार्यतत्परता आणि विशेष कौशल्य सादरीकरणासाठी त्यांचा राष्ट्रपती पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता. या घटनेत १५ जणांचे जीव वाचवण्यात मुंबई अग्निशमन दलाला यश आले होते. याआधी राजस्थानच्या भूजच्या भूकंपातही त्यांनी उल्लेखनीय अशी कामगिरी केली आहे. मुंबईतील सर्च एण्ड रेस्क्यू टीमचेही नेतृत्व त्यांनी केले आहे. तसेच अनेक रेस्क्यू ऑपरेशनमध्ये त्यांनी महत्वाची जबाबदारी पार पाडली आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages