मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, ९७५ नवीन रुग्ण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

JPN NEWS

१७ ऑगस्ट २०२२

मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, ९७५ नवीन रुग्ण



मुंबई - मुंबईत आटोक्यात आलेली कोरोना रुग्णांची संख्या मागील काही दिवसांपासून वाढते आहे. बुधवारी दिवसभरात ९७५ नवीन रुग्णांची नोंद झाली. यातील ५९ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून १२ रुग्णांना ऑक्सिजन बेडवर ठेवण्यात आले आहेत. तर दिवसभरात दोन रुग्णांचा मृत्यू झाला. २४ तासांत ८,१७३ कोरोना चाचण्या करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

मुंबईत मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या सलग वाढताना दिसते आहे. अडीचशेच्या आत नोंद होणारी रुग्णसंख्या साडेनऊशेवर गेली आहे. मागील शनिवारी ८६७ रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर रुग्णसंख्या वाढते आहे. मागील दीड, दोन महिन्यांपासून कोरोनाचा प्रभाव कमी झाला होता. रोज दोनशे ते अडीचशेच्या आत रुग्णांची नोंद होत होती. यातील रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाणही कमी होते. त्यामुळे कोरोना रुग्ण आटोक्यात आल्याचे समाधानकारक चित्र असताना आता रुग्णसंख्या वाढते आहे. दिवसभरात ९७५ रुग्णांची नोंद झाली आहे. तर ८५० रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत ११ लाख ९ हजार ६१७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७.८ टक्केवर आला आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी १०८८ दिवसांवर आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

JPN NEWS