
गणेशोत्सव साजरे करण्याच्या पद्धतीत अनेक चांगले बदल झाले आहेत. पर्यावरणपूरक उत्सव साजरे होत असतानाच गणेशोत्सवाद्वारे विविध सामाजिक संदेश, जनजागृती अथवा एखाद्या व्यक्ती- संस्थेचे कामकाज लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे तसेच घरगुती गणपती देखाव्याद्वारे केले जात आहे. मुंबईच्या फ्रँकलिन पॉल यांनीदेखील यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘कर्करोगग्रस्त रुग्णांची कहाणी’ या संकल्पनेवर आधारित देखावा साकारला आहे. रतन टाटा यांना अभिवादन करण्यासाठी त्यांनी ‘पॉलचा लाडका’च्या माध्यमातून ‘टाटा कॅन्सर रुग्णालय आणि आजूबाजूचा परिसर’ याची प्रतिकृती तयार केली आहे. २० जणांच्या विशेष मेहनतीने हा देखावा उभारण्यात आला आहे.

ليست هناك تعليقات:
إرسال تعليق