मुंबई - जमीन अतिक्रमणाच्या तक्रारीवरून मुंबई महापालिकेने १५ डिसेंबर रोजी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या दादर युनियन स्पोर्टिंग क्लबला नोटीस बजावली आहे. या नोटीसीनंतर वेंगसरकर यांनी, कोणत्याही जमिनीवर अतिक्रमण केलेले नाही आणि क्लब नियमांनुसार, चालत असल्याचा दावा केला आहे.
दादर युनियन स्पोर्टिंग क्लबच्या शेजारी असलेल्या दादर (पूर्व) येथील पारशी कॉलनी परिसरात शंभर वर्षे जुन्या दादर पारसी कॉलनी स्पोर्टिंग क्लबच्या सदस्यांनी ही तक्रार केली होती. डीपीसीएससी ची स्थापना १९२३ मध्ये रिकाम्या जमिनीवर भाडेकरार धोरणांतर्गत उभारणी केली होती. मुंबई महापालिकेने लोकांच्या मनोरंजनासाठी किंवा लोकांना मूलभूत सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने ही जागा भाड्याने दिली होती. दादर पारसी कॉलनी स्पोर्टिंग क्लबच्या कमी जागेमध्ये नवीन खेळपट्टी तयार केल्याचा आरोप दिलीप वेंगसकर यांच्यावर केला आहे.

दरम्यान त्यांना दिलेल्या खेळपट्टीची जागा वाढवून त्यांनी नवीन खेळपट्टी तयार केली, त्यामुळे ही वाढीव जागा त्यांचीच असल्याची माहिती सादर करण्यासाठी महापालिकेकडून त्यांना पत्र पाठवण्यात आले आहे. कमी जागेमध्ये नवीन खेळपट्टी तयार केल्याचा आरोप यात करण्यात आला आहे. तसेच दोन खेळपट्ट्या फारच वेगळ्या आहेत आणि हे खेळाडूंसाठी धोकादायक आहे, असेही त्यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे. खेळपट्ट्या योग्य अंतरावर असतील यासाठी काही नियम तयार करावेत अशी विनंतीही त्यांनी केली आहे. हे पत्र २९ एप्रिलला वॉर्ड कार्यालयाला पाठवण्यात आले होते. गेल्या आठवड्यात नोव्हेंबरपर्यंत पालिकेने कोणतीही कारवाई केली नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ज्या जमिनीवर नवीन खेळपट्टी तयार करण्यात आली आहे ती जागा डीयूपीसीचा नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे.

ليست هناك تعليقات:
إرسال تعليق