
नोकरदार महिलांना त्यांच्या लहान मुलांची काळजी, स्तनपान करता यावे, याकरिता कार्यालयांमध्ये हिरकणी कक्ष आहेत. अधिवेशनादरम्यान आमदार अहिरे यांना त्यांच्या बाळाची काळजी घेता यावी यासाठी नागपूर येथील विधिमंडळाच्या विस्तारीत इमारतीतील दालन क्रमांक १०६ मध्ये हिरकणी कक्ष सुरू करण्यात आला आहे. आरोग्य विभागाच्या माध्यमातून त्याचे कामकाज केले जात असून याठिकाणी स्वतंत्र खोली, पाळणा, वैद्यकीय सुविधा आहेत.
अधिवेशनासाठी बाळासह आलेल्या आमदार सरोज अहिरे यांचे कर्तृत्व आणि मातृत्वाचा सन्मान करीत काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे कौतुक केले होते. आज हिरकणी कक्षाचे उद्घाटन देखील आमदार अहिरे यांच्या हस्ते करावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यानुसार सकाळी हिरकणी कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.

ليست هناك تعليقات:
إرسال تعليق