माता आरोग्य क्षेत्रात कामगिरीबद्दल महाराष्ट्राला दोन राष्ट्रीय पुरस्कार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 December 2022

माता आरोग्य क्षेत्रात कामगिरीबद्दल महाराष्ट्राला दोन राष्ट्रीय पुरस्कार


मुंबई - माता आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून माता मृत्यू दर कमी करण्यासाठी तसेच प्रसूतीदरम्यान पुरविल्या जाणाऱ्या सुविधांची गुणवत्ता वाढविण्यासाठी लक्ष्य संस्था प्रमाणिकरणामध्ये महाराष्ट्राला राष्ट्रीय स्तरावर दोन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. या यशाबद्दल राज्याचे आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

सामाजिक विकास ध्येय (SDG) साध्य करण्यासाठी आणि देशातील माता मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी माता आरोग्य केंद्रात नाविन्यपूर्ण योजनांची देवाणघेवाणविचार विनिमयासाठी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय मातृत्व आरोग्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. माता मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेची मुख्य संकल्पना टाळता येण्याजोग्ये माता मृत्यू प्रमाण शून्य करण्यासाठी प्रयत्न’ अशी होती.

माता आरोग्याच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्यांना पुरस्कार देण्यात आले आहेत. नोव्हेंबर २०२२ मध्ये रजिस्ट्रार जनरल इंडियाने प्रकाशित केलेल्या नमुना नोंदणी प्रणालीच्या सर्वेक्षण अहवालानुसार सन २०१७-१९ मध्ये देशातील मातामृत्यु प्रमाण १०३ प्रति लक्षवरुन सन २०१८-२० मध्ये ९७ प्रति लक्ष झालेला आहे.

          

राज्यामध्ये मातामृत्यू प्रमाण सन २०१७-१९ च्या ३८ प्रति लक्ष वरुन सन २०१८-२० मध्ये ३३ प्रति लक्ष झाला आहे. देशामध्ये मातामृत्यूचे प्रमाण कमी करण्यावर महाराष्ट्र राज्य दुसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर केरळ राज्य आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने जननी सुरक्षा योजनाजननी शिशु सुरक्षा कार्यक्रमप्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानमातृत्व अनुदान योजनामानव विकास कार्यक्रमप्रधानमंत्री मातृ वंदना योजना इत्यादी योजना प्रभावीपणे राबवल्या तसेच सुरक्षित मातृत्वासाठी विविध उपाय योजना राबवल्यामुळे राज्याला साध्य करता आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad